दुःखद निधन : मारोतीराव ढगे यांचे अल्प आजाराने निधन
परभणी : सेलू येथील पत्रकार राजेश ढगे यांचे वडील आणि परतूर पंचायत समितीचे सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी मारोतीराव बापूराव ढगे (वय ७६, रा. विष्णूनगर, सेलू) यांचे बुधवारी (२३ नोव्हेंबर) अल्प आजाराने उपचारादरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सेलू येथील तहसील रोडवरील वैकुंठधाममध्ये सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शहरातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.