सांस्कृतिक महोत्सव : चारठाण्यात आज रंगणार संगीत समारोह, हेरिटेज वॉक
जागतिक वारसा सप्ताह : राज्य पुरातत्व विभाग, देवगिरी संगीत प्रतिष्ठानचा पुढाकार
बाबासाहेब हेलसकर…
सेलू,जि.परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे जागतिक वारसा सप्ताहानिमित्त राज्य पुरातत्व विभाग आणि देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवारी, २४ नोव्हेंबर रोजी चारठाणा येथील गोकुळेश्वर मंदिर परिसरात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत संगीत समारोह, हेरिटेज वॉक सह विविध कार्यक्रम होणार आहेत.
सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन आहे. या वेळी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक अमोल गोटे, पुरातत्व सहायक मयुरेश खडके, सेलू-जिंतूरच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार सखाराम मांडवगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाताई राऊत, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, नानासाहेब राऊत, सरपंच अनिरुद्ध चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.
यानिमित्ताने हेरिटेज वॉक अंतर्गत उपस्थित मान्यवर गावातील प्राचिन मंदिरांना संयुक्तपणे भेट देणार आहेत. ऐतिहासिक वारसा गटाचे सदस्य तथा माहिती विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांनी रेखाटलेल्या वारसा स्थळांच्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन या वेळी होईल. महोत्सवातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन नानासाहेब राऊत, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, उपसरपंच वाजेद कुरेशी, धोरण देशमुख, मतिन तांबोळी, गणेश पारवे, मुन्ना तमशेटे लक्ष्मीकांत सोनवटकर व ग्रामस्थांनी यांनी केले आहे. दरम्यान, बुधवारी ग्रामपंचायतच्या वतीने दिवसभर ग्रामस्वच्छता करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील गावागावातून ऐतिहासिक वारसा संगोपन व संवर्धनासाठी गेली पाच वर्षे झटणार्या 30 कार्यकर्त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता या कार्यकर्ते मंडळींसोबत चर्चासत्र होईल. ऐतिहासिक वारसा स्थळांची देखभाल या विषयावर सहाय्यक संचालक अमोल गोटे,मयुरेश खडके,जिल्हा ऐतिहासिक वारसा गटाचे अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.महोत्सवांतर्गत चारठाणा येथील पुष्करणी जवळ सायंकाळी साडेसहा वाजता संगीत समारोहाचे उद्घाटन होईल.
प्रारंभी सारंग अर्धापूरकर यांचे सतारवादन होईल. त्यानंतर प्रा.कृष्णराज लव्हेकर यांचे गायन होईल. सहकलाकार म्हणून शांतीभूषण चारठाणकर,मयूर काकडे, विशाल धानोरकर आहेत. औरंगाबाद एम.जी.एम.च्या विद्यार्थिनी स्वराली सोपे, कुलकर्णी या शास्रीयनृत्य सादर करतील. परभणी जिल्ह्यातील गावागावातून ऐतिहासिक वारसा संगोपन व संवर्धनासाठी गेली पाच वर्षे झटणार्या 30 कार्यकर्त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार प्रारंभी सारंग अर्धापूरकर यांचे सतारवादन होईल. त्यानंतर प्रा.कृष्णराज लव्हेकर यांचे गायन होईल. सहकलाकार म्हणून शांतीभूषण चारठाणकर,मयूर काकडे, विशाल धानोरकर आहेत. औरंगाबाद एम.जी.एम.च्या विद्यार्थिनी स्वराली भोपे, ईशानी कुलकर्णी या शास्रीयनृत्य सादर करतील.