श्री केशवराज फेस्टिव्हल : स्थळाचे सेलूत भूमीपूजन, सोमवारपासून रसिकांना सांस्कृतिक मेजवानी

श्री केशवराज फेस्टिव्हल : स्थळाचे सेलूत भूमीपूजन, सोमवारपासून रसिकांना सांस्कृतिक मेजवानी

आयोजक अशोक काकडे यांची माहिती : कीर्तन, मनोरंजन,महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धा

बाबासाहेब हेलसकर…

सेलू,जि.परभणी : येथील ग्रामदैवत सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला ३० नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी सभापती यांच्या पुढाकाराने सोमवार, २८ नोव्हेंबर ते बुधवार, ३० नोव्हेंबर पर्यंत श्री केशवराज फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.‌ नूतन विद्यालयाच्या पाठीमागील मैदानावर हा फेस्टिव्हल आहे. स्थळी गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यानिमित्ताने सोमवारपासून सेलूतील रसिकांना गीत, संगीत, नृत्य अभिनय, कीर्तन, प्रबोधन अशी सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
सेलू शहराचा सांस्कृतिक, सामाजिक वारसा समृद्ध व्हावा, या उद्देशाने श्री केशवराज फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे, असे आयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांनी सांगितले. सर्व कार्यक्रमांना सेलू व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सोमवारी, 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता माजी आमदार विजय भांबळे यांचा वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा व ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन आहे.
दुसर्‍या दिवशी मंगळवारी, 29 नोव्हेंबर रोजी सिनेअभिनेता ‘ क्रांती नाना मळेगावकर ” प्रस्तुत ‘न्यू होम मिनिस्टर… खेळ पैठणीचा” हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस स्कुटी, द्वितीय फ्रिज, तसेच सात पैठणी. याशिवाय मिक्सर, प्रेशर कुकर, 25 सिलव्हर ज्वेलरी सेट, 25 साडी, 10 बैंगल्स बॉक्स, 10 लेडिज पर्स आणि 40 इतर आकर्षक बक्षिसांसह लाखों रुपयांची बक्षिसे मिळविण्याची संधी सहभागी महिलांना मिळणार आहे. या स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. बुधवारी, 30  नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कलारंजना मुंबई निर्मित चाळीस कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम “मराठी पाऊल पडते पुढे” हा महाराष्ट्राच्या संसस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम आहे.  या प्रसंगी परमवीर अब्दुल हमीद पुरस्कारप्राप्त सेलूचे भूमीपूत्र उद्योजक रामप्रसादजी घोडके यांचा नागरी सत्कार सोहळा आहे. सर्व सर्व कार्यक्रमांना सेलू व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अशोक काकडे व संयोजन समितीने केले आहे.

फेस्टिव्हल स्थळाचे भूमीपूजन :

श्री केशवराज फेस्टिव्हलची जय्यत तयारी सूरू झाली असून, गुरूवारी २४ नोव्हेंबर रोजी नूतन विद्यालयाच्या पाठीमागील मैदानावर बाबासाहेब मंदीराचे मुख्य पुजारी सुधीर मंडलिक यांच्या हस्ते फेस्टिव्हल स्थळाचे भूमिपूजन झाले. यावेळी डॉ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय रोडगे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, आयोजक अशोक काकडे,  पंचायत समितीचे माजी सभापती पुरूषोत्तम पावडे, तालुकाध्यक्ष माऊली ताठे, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, शहराध्यक्ष रघुनाथ बागल,  जिल्हा परिषद सदस्य ॲड बालासाहेब रोडगे, युवक तालुकाध्यक्ष  अजय डासाळकर, दत्तुसिंग ठाकुर, गौस लाला,आशाताई गायकवाड, शेख कौसर, मजीद बागवान, उदय रोडगे, पप्पू शिंदे, सचिन शिंदे, विशाल देशमुख, भारत इंद्रोके, गोटू धापसे, वाल्मीक खुळे विष्णू बागल, परवेश लाला, सौदागर अशोक उफाडे, शिवाजी गजमल आदींची उपस्थिती होती.

आयोजक अशोक काकडे यांची माहिती : कीर्तन, मनोरंजन,महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धा

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!