RBI काय म्हणते ? : सेलूतील साईबाबा बँकेत कर्मचार्यांना प्रशिक्षण
बँक तज्ज्ञ डॉ.संजय औटी यांचे मार्गदर्शन, अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात शनिवारी, दहा डिसेंबर रोजी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, तज्ज्ञ संचालक डी.व्ही. मुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद येथील लोकविकास नागरी बँकेचे डॉ.संजय औटी यांनी मार्गदर्शन केले. आर.बी.आय ने वेळोवेळी दिलेले निर्देश, वसुली, कलम 101, विविध कायदे, दोष विरहित कर्ज वाटप, कर्ज मागणीमध्ये अचूकता आदी संदर्भात औटी यांनी सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक आर.बी. देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन संतोष हुगे, तर व्यवस्थापक दत्ता पौळ यांनी आभार मानले. प्रशिक्षणात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.