NCP : टाकळखोपा येथील भाजपा कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

NCP : टाकळखोपा येथील भाजपा कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

माजी आमदार विजय भांबळे यांची उपस्थिती

जिंतूर, १० डिसेंबर : टाकळखोपा येथील भाजप कार्यकर्त्यांचा भाजपा मधील ध्येय धोरणे व स्थानिकच्या गटबाजीला कंटाळून माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, महिला तालुका अध्यक्ष मनीषा केंद्रे, माजी पंचायत समिती सभापती गणेशराव इलग, माजी पंचायत समिती सदस्य राहुल कनकुटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बाबाराव घुगे, रुपेश घुगे, विठ्ठल घुगे, देवबा वाव्हळ, रहीम शेख, विष्णू वाव्हळ, अमोल महाराज घुगे, नरुजी दळवे, मुंजाजी दळवे, विलास दळवे, वामन पवार, विक्रम दळवे, पांडुरंग माळकरी, पिंटू जाधव, मथु जाधव, गणेश जाधव, रामराव जाधव, विजय माने, दिलीप वाघमारे, वामन घनसावंत, लक्ष्मण गहुगे, जगन घुगे, रमेश वाव्हळ, बाळू राठोड, कैलास वाघमारे व लक्ष्मण जाधव आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा संयोजक शंकर जनार्दन माने, जवळा (खुर्द) यांच्यासह अविनाश गंगाधरराव भिसे, मैनाजी विक्रम माने, रा. जवळा (खुर्द) यांनीही या वेळी प्रवेश केला.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!