‘नूतन कन्या’चा सुवर्ण महोत्सव : स्वप्ने साकारण्यासाठी परिश्रमांत सातत्य गरजेचे : आमदार मेघना बोर्डीकर     

‘नूतन कन्या’चा सुवर्ण महोत्सव : स्वप्ने साकारण्यासाठी परिश्रमांत सातत्य गरजेचे : आमदार मेघना बोर्डीकर     

सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष व सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन  

सेलू जि.परभणी, १४ डिसेंबर : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित, श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन जिंतूर-सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी झाले. या वेळी बोलताना आमदार बोर्डीकर म्हणाल्या, ” स्वप्ने पहा, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. त्यात सातत्य ठेवा. आईवडिलांच्या स्वप्नांसाठी सदैव तयार रहा, प्रयत्नशील राहा आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवा.” अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया होते. उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरुजी, सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापिका संगीता खराबे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा माधुरी देशपांडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता खराबे यांनी केले. याप्रसंगी उल्लेखनीय कार्याबद्दल कला शिक्षक गजानन मजगे, कैलास मलवडे, कीर्ती राऊत, सीमा सुकते, विजया खडके, सुरेखा आगळे आणि विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात डॉ. लोया यांनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. भालचंद्र गांजापुरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 

सुवर्णमहोत्सवी वर्ष ‘लोगो ‘चे विमोचन

या वेळी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष ‘लोगो ‘चे विमोचन करण्यात आले. प्रारंभी सरस्वती आणि नटराज प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन आले. पूजा महाजन यांनी स्वागत गीत गायले. गंगाधर कान्हेकर यांनी तबल्यावर साथ संगत केली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

'नूतन कन्या'चा सुवर्ण महोत्सव : स्वप्ने साकारण्यासाठी परिश्रमांत सातत्य गरजेचे : आमदार मेघना बोर्डीकर     

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!