गुणगौरव : राष्ट्रीय खेळाडूंचा लातुरात गौरव 

गुणगौरव : राष्ट्रीय खेळाडूंचा लातुरात गौरव

लातूर जिल्हा टेनिस व्हाॅलिबाॅल असोसिएशनचा उपक्रम 

लातूर : लातूर जिल्हा टेनिस व्हाॅलिबाॅल असोसिएशनच्या वतीने लातुर येथे राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेले खेळाडू अविनाश जाधव व शौर्य शिंदे यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा टेनिस व्हाॅलिबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए.सचिन शिंदे हे उपस्थित होते खेळातून खरा नागरिक घडतो खेळामुळे जिद्द परिश्रम चिकाटी ह्या गोष्टी अवगत होतात व संघभावना नेतृत्व गुण विकसित होतात त्यामुळे विद्यार्थ्यानी खेळले पाहिजे असे प्रतिपादन सचिन शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले. यशस्वी खेळाडूंना भारतीय टेनिस व्हाॅलिबाॅल महासंघाचे सरचिटणीस डॉ.व्यंकटेश वांगवाड, माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, महाराष्ट्र राज्य सचिव गणेश माळवे, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र पांगळ, विनोद जैन सचिव आनंद घाडगे, सहसचिव संतोष शिंदे, राहुल पेटकर, मधुकर पवार यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!