Cotton Cluster : सेलूत केशवराज कॉटन क्लस्टरच्या ‘सीएफसी’चे भूमीपूजन; उद्योगांना नवसंजीवनी

Cotton Cluster : सेलूत केशवराज कॉटन क्लस्टरच्या ‘सीएफसी’चे भूमीपूजन; उद्योगांना नवसंजीवनी

सेलू इंडस्ट्रियल ओनर्स असोसिएशनची माहिती, सहा महिन्यांत होणार उभारणी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, रोजगार निर्मितीला चालना

Cotton Cluster : सेलूत केशवराज कॉटन क्लस्टरच्या 'सीएफसी'चे भूमीपूजन; उद्योगांना नवसंजीवनी

बाबासाहेब हेलसकर

सेलू जि.परभणी, १६ डिसेंबर : शासनाच्या लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत (MSI-CDP)परभणी जिल्ह्यातील पहिले क्लस्टर ठरलेल्या सेलू येथील “केशवराज कॉटन क्लस्टर” च्या कॉमन फॅसिलिटी सेंटरचे (सीएफसी) भूमीपूजन शुक्रवारी (१६ डिसेंबर) मोठ्या उत्साहात झाले. या माध्यमातून सेलू परिसरात फुलू लागलेल्या कृषी पूरक उद्योगांना नवसंजीवनी मिळणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. येत्या सहा महिन्यांत हा प्रकल्प आकाराला आणण्यासाठी शहरातील उद्योजकांनी कंबर कसली आहे.

जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी रवींद्र पत्की, पवार, परभणी जिल्हा जिंनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश डागा, एसपीवीचे अध्यक्ष रामेश्वर राठी, सेलूभूषण जयप्रकाश बिहाणी, सीतारामजी मंत्री, नंदकिशोर बाहेती यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. केंद्र तसेच राज्य सरकारने औद्योगिक समूह विकास योजना म्हणजेच राज्यात विविध उद्योगांचे क्लस्टर सुरू केले आहेत. त्यामुळे उद्योगांच्या उत्पादकतेत वाढ अपेक्षित होऊन नव्या रोजगार निर्मितीवर भर दिला जातो आहे. कॉमन फॅसिलिटी सेंटर्सला (सीएफसी) केंद्राच्या योजनेतून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. राज्य सरकारच्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या या सीएफसींना पाठबळ दिले जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत पाच ऑगस्ट २०२२  ‘सीएफसी’साठी मंजुरी देण्यात आली आहे, असे सेलू इंडस्ट्रियल ओनर्स असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. या अंतर्गत कॉटन टेस्टिंग लॅब व ओईल मिल लॅब उभारण्यात येत असून, याचा फायदा सेलू शहर व परिसरातील उद्योगांना होणार आहे. योजनेसाठी एकूण 427.37 लाखाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( Detailed Project Report-DPR ) मंजूर झाला. यातील तीस टक्के गुंतवणूकीची रक्कम 131.32 लाख रुपये एसपीवी मार्फत होईल व सत्तर टक्के अनुदानित रक्कम राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडून 296.05 लाख अनुदानित राहील. येत्या सहा महिन्यामध्ये क्लस्टर उभारण्यात येणार आहे. सेलूतील कॉटन क्लस्टर हे परभणी जिल्ह्यातील पहिले क्लस्टर असून याचा फायदा परिसरातील जिनिंग व इतर उद्योगांना तसेच शेतकरी बांधवाना देखील होणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल, उद्योग विभागाचे अधिकारी हर्षदीप कांबळे  उद्योग विभागाचे सचिव दीपेंद्र कुशवाह, विकास आयुक्त लोंढे, जेडीआय क्लस्टर मुंबईचे यशवंते, औरंगाबादच्या सौ.कुलकर्णी, नांदेडचे कोळेकर, परभणीचे प्रकाश हनबर, शासकीय तथा निम्न शासकीय अधिकाऱ्यांचे या क्लस्टर मंजुरीसाठी बहुमोल सहकार्य, मार्गदर्शन लाभले आहे.

भूमीपूजन समारंभाला संचालक ब्रिजगोपाल काबरा, संतोष सोमाणी अविनाश बिहाणी, नीलेश बिनायके, सचिन तोष्णीवाल, संजय छल्लानी, कमल मालधने, अक्षय नहार; उद्योजक विजयकुमार बिहाणी, संजय लोया, श्री.तोष्णीवाल, श्री मणियार, श्री परताणी, प्रफुल्ल बिनायके, महेश खारकर, हरिकिशन शर्मा, एसबीआय लीड बँक मनेजर सुनील हट्टेकर, सेलु एसबीआय शाखा व्यवस्थापक अनंत गावडे, ॲड.उमेश खारकर, रामकृष्ण शेरे, बंडूनाना देशमुख सेलूतील  उद्योजकांची उपस्थिती होती.

427.37 लाखांची गुंतवणूक

योजनेसाठी एकूण 427.37 लाखाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( Detailed Project Report-DPR ) मंजूर झाला. यातील तीस टक्के गुंतवणूकीची रक्कम 131.32 लाख रुपये एसपीवी मार्फत होईल व सत्तर टक्के अनुदानित रक्कम राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडून 296.05 लाख अनुदानित राहील. येत्या सहा महिन्यामध्ये क्लस्टर उभारण्यात येणार आहे. सेलूतील कॉटन क्लस्टर हे परभणी जिल्ह्यातील पहिले क्लस्टर असून याचा फायदा परिसरातील जिनिंग व इतर उद्योगांना तसेच शेतकरी बांधवाना देखील होणार आहे, असे सेलू इंडस्ट्रियल ओनर्स असोसिएशनने कळविले आहे.

Cotton Cluster : सेलूत केशवराज कॉटन क्लस्टरच्या 'सीएफसी'चे भूमीपूजन; उद्योगांना नवसंजीवनी

हेही वाचा : आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते

हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण

हेही वाचा : न्यू होम मिनिस्टर‌ : पाथरीतील महिलांचा तुफान प्रतिसाद प्रतिसाद ; आमदार दुर्राणी यांचे आयोजन

हेही वाचा : तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन

हेही वाचा : थोर संतांवर विकृत टीका : सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला सेलूतील वारकऱ्यांनी मारले जोडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!