न्यू होम मिनिस्टर‌ : पाथरीतील महिलांचा तुफान प्रतिसाद प्रतिसाद ; आमदार दुर्राणी यांचे आयोजन

न्यू होम मिनिस्टर‌ : पाथरीतील महिलांचा तुफान प्रतिसाद प्रतिसाद ; आमदार दुर्राणी यांचे आयोजन

खासदार शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम

पाथरी जि.परभणी,१७ डिसेंबर : श्री साईजन्मभूमी पाथरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवनांद्रा माध्यमिक विद्यालय परिसरात आ

पाथरी जि.परभणी,१७ डिसेंबर : श्री साईजन्मभूमी पाथरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवनांद्रा माध्यमिक विद्यालय परिसरात आयोजित ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला पाथरीतील महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला. पाच हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवून पाथरीत सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घेतला.
सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. तब्बल पाच तास कार्यक्रम चालला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने हा करण्यात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शाहिस्ता बेगम अब्दुल्लाह खान दुर्राणी होत्या.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. खेळीमेळीच्या वातावरणात आव्हानात्मक स्पर्धा घेत, आपल्या विनोद बुद्धीने आलेल्या सर्व पाथरीकरांची क्रांतीनाना यांनी मने जिंकली. अलोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नियोजन व व्यवस्थापनात उत्तर होते. देवेंद्र देशमुख यांच्या टीम व पाथरी पोलिसांनी शिस्तबद्ध चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रास्ताविक राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांनी केले.सूत्रसंचालन भिसे यांनी केले.
विजेत्यांना केली बक्षिसांची लयलूट
प्रथम पारितोषिक ( स्कुटी ) धनश्री थोरात यांना, द्वितीय बक्षीस ( फ्रिज )सौ.सुरेखा झिंजुर्डे यांना तर तृतीय बक्षीस मयुरी करपे यांना (वॉशिंग मशीन ) देण्यात आले. प्रोत्साहनपर दोनशे पेक्षा जास्त बक्षिसे देण्यात आली. बीड जिल्ह्यातील सोमठाणा येथील आरती दीपक रणदिवे व प्रज्ञा बबन भालेराव यांनी शेवटपर्यंत विजयी होण्यासाठी संघर्ष केला; परंतु त्यांना यशाने हुलकावणी दिली.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील गरीब महिलेला प्रथम बक्षीस मिळाले. याचे सर्व श्रेय आ.बाबाजानी दुर्राणी व क्रांतीनाना मळेगावकर यांना जाते. मी कधी स्कुटी गाडीचा स्वप्नातही विचार केला नव्हता; परंतु या चांगल्या कार्यक्रमाचे आयोजनामुळे ते स्वप्न शक्य झाले आहे. माझ्याकडे पुढे बोलायला शब्द नाहीत. आमदार बाबाजानी दुर्राणींचे उपकार,‌ क्रांतीनानांबद्द्ल स्वाभिमान आहे, अशा भावना पाथरी न्यू होम मिनिस्टर च्या प्रथम विजेत्या ठरलेल्या धनश्री थोरात यांनी व्यक्त केल्या.
उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या आमच्या सर्वच सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन, महिलांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद पाहता पुढील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापक प्रमाणावर न्यू होम मिनिस्टरचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही आयोजक आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी बोलताना दिली.

माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील गरीब महिलेला प्रथम बक्षीस मिळाले. याचे सर्व श्रेय आमदार बाबाजानी दुर्राणी व क्रांतीनाना मळेगावकर यांना जाते. मी कधी स्कुटी गाडीचा स्वप्नातही विचार केला नव्हता; परंतु या चांगल्या कार्यक्रमाचे आयोजनामुळे ते स्वप्न शक्य झाले आहे. माझ्याकडे पुढे बोलायला शब्द नाहीत. आमदार बाबाजानी दुर्राणींचे उपकार,‌ क्रांतीनानांबद्द्ल स्वाभिमान आहे, अशा भावना पाथरी न्यू होम मिनिस्टर च्या प्रथम विजेत्या ठरलेल्या धनश्री थोरात यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा : Cotton Cluster : सेलूत केशवराज कॉटन क्लस्टरच्या सीएफसीचे भूमीपूजन; उद्योगांना नवसंजीवनी

हेही वाचा : आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते

हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण

हेही वाचा : तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन

हेही वाचा : थोर संतांवर विकृत टीका : सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला सेलूतील वारकऱ्यांनी मारले जोडे

हेही वाचा : अभिनंदनीय : नूतन कन्या शाळेचे ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदेंचा ‘भारत भूषण’ ने गौरव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!