अभिनंदनीय : नूतन कन्या शाळेचे ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदेंचा ‘भारत भूषण’ ने गौरव

पाथरी जि.परभणी,१७ डिसेंबर : श्री साईजन्मभूमी पाथरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवनांद्रा माध्यमिक विद्यालय परिसरात आ

अभिनंदनीय : नूतन कन्या शाळेचे ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदेंचा ‘भारत भूषण’ ने गौरव

भोपाळ येथील सोहळ्यात पुरस्कार वितरण, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

सेलू जि.परभणी :  नीती आयोग भारत सरकार संलग्न नॅशनल अँटी हरासमेंट ऑर्गनायजेशनच्या वतीने येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या शाळेचे ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे यांचा भारत भूषण पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला. भोपाळ येथे आयोजित या सोहळ्यात देशभरातल्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक आणि समाजिक कार्याबद्दल शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. या वेऴी मेजर जनरल तेजपाल सिंह रावत, गीतकार अरुण बक्षीजी, दिग्दर्शक सुनील सोन्हीया,ऑर्गनायजेशन सीईओ प्रतिभा चौरसिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुरस्काराबद्द्ल संस्थेचे माजी सचिव प्राचार्य द.रा.कुलकर्णी, अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरूजी, सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर , सहसचिव जयप्रकाश बिहाणी,  शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती,  प्राचार्य शरद कुलकर्णी, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्ता घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा : Cotton Cluster : सेलूत केशवराज कॉटन क्लस्टरच्या सीएफसीचे भूमीपूजन; उद्योगांना नवसंजीवनी

हेही वाचा : आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते

हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण

हेही वाचा : न्यू होम मिनिस्टर‌ : पाथरीतील महिलांचा तुफान प्रतिसाद प्रतिसाद ; आमदार दुर्राणी यांचे आयोजन

हेही वाचा : तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन

हेही वाचा : थोर संतांवर विकृत टीका : सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला सेलूतील वारकऱ्यांनी मारले जोडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!