थोर संतांवर विकृत टीका : सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला सेलूतील वारकऱ्यांनी मारले जोडे
‘पुंडलिक वर दे’चा जयघोष : अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिस प्रशासनाला निवेदन
सेलू जि.परभणी : सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रादयाच्या मांदीयाळीतील थोर संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांच्यावर सहहेतू विकृत टिकात्मक विडंबन केले आहे तसेच त्यांनी आपले उपास्य दैवत प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्यावर देखील टिका केली आहे. असा आरोप करीत शनिवारी ( 17 डिसेंबर) अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारले. तीव्र निषेध आंदोलन केले.
सेलू पोलिस ठाण्याचे निरीक्षक व प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सुषमा अंधारे या महिलेने वारकरी संप्रादयाच्या मांदीयाळीतील थोर संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांच्यावर सहेतू विकृत टिकात्मक विडंबन केले आहे तसेच त्यांनी आपले उपास्य दैवत प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्यावर देखील टिका केली आहे. महाराष्ट्र संताची भूमी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राला शेकडो वर्षाची परंपरा ही केवळ संताच्या विचाराची द्योतक आहे. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. चुकीच्या व समाजात तेढ निर्माण करुन वातारण दुषित करण्याऱ्या या वक्तव्यामूळे अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा, सेलू तालुक्यातील सर्व संयुक्त वारकरी संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पुरुषोत्तम महाराज वालूरकर, जयराम महाराज तांगडे, महादेव महाराज ढवळे, प्रसाद महाराज काष्टे
प्रकाश महाराज सेलवाडीकर, दगडोबा जोगदंड महाराज, केशेव महाराज पालवे, रमेश महाराज मोरे, माणिक महाराज चव्हाण, महादेव महाराज बोचरे, पांडुरंग महाराज पौळ, अच्युत महाराज आंधळे, कृष्णा महाराज रासवे,जयसिंग शेळके, भागवत दळवे, शिवहारी शेवाळे, संदीप बोकण, कपिल फुलारी, अर्जुन बोरुळगोविंद मगर, बाळु काजळे, विठ्ठल कोकर, पराग गोरेगावकर, गोविंद शर्मा, नागेश ठाकूर, महादेव गटकळ, अमोल भोसले, लक्षमण गायके, रुपाली ठाकूर,आरती समेळ, कमल राजूरकर, राधा केसरखाने,बसंता ठाकूर,रामकोर जटाळ
हेही वाचा : आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते
हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण
हेही वाचा : तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन