तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन
सेलूतील क्रांंती चौकात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तीव्र निषेध
सेलू जि.परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करणाऱ्या पाकिस्तानी मंत्री बिलावल भुत्तो यांचा तीव्र निषेध म्हणून, सेलू येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्यांनी क्रांती चौकात बिलावल भुत्तो यांचा पुतळा व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन केले. भारत माता की जय, वंदे मातरम् चा जयघोष करीत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत संताप व्यक्त केला. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, माजी सैनिक गोरख राऊत, कपिल फुलारी, भागवत दळवे, अर्जुन बोरूळ, बाळासाहेब काजळे, पराग गोळेगावकर, महादेव गटकळ, गोविंद शर्मा, नागेश ठाकुर, विठ्ठल कोकर, रुपाली ठाकूर ,बबिता ठाकूर, कृष्णा चव्हाण, आरती समेळ, कमल राजूरकर, राधा केशरखाने, रामकोर जट्टळ, पवन धुमाळ, पंकज वायाळ, रामेश्वर वाघमारे, ईश्वर तावरे, अमोल भोसले आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा : आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते
हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण