आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते
आंतरभारतीचे कार्याध्यक्ष अमर हबीब यांची माहिती, ; उदगीर येथे स्नेहमिलन मेळाव्यात 25 तारखेला पुरस्कार वितरण
सेलू, जि.परभणी : आंतरभारती ट्रस्ट द्वारा महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, नांदेडच्या जे.आर.कोकंडाकर यांनी प्रथम पुरस्कार मिळविला आहे. अंबाजोगाईचे डॉ.सागर शरद कुलकर्णी द्वितीय, तर जालन्याच्या अंतरा धनश्री रामदास कुलकर्णी ही तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
आंतरभारती ट्रस्टचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संयोजक अमर हबीब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख दहा हजार रुपये, व्दितीय सात हजार रुपये, तृतीय तीन हजार रुपये व प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विजेत्यांना रविवारी (२५ डिसेंबर) उदगीर येथे आयोजित आंतरभारतीच्या स्नेहमिलन कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. ‘महात्मा गांधींची प्रासंगिकता’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. स्थानिक; तसेच जिल्हास्तरावरील गुणानुक्रमे पहिले तीन पारितोषिक पात्र निबंध राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आले. त्यातून तीन निबंधाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अमर हबीब (संयोजक), संगीता देशमुख (वसमत) व कल्पना हेलसकर (सेलू) यांची या स्पर्धेसाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने या स्पर्धेचे नियोजन केले. त्यांना स्थानिक संयोजकांनी सहकार्य केले होते.
उदगीरच्या स्नेहमिलन मेळाव्यात वितरण
आंतरभारती लातूर जिल्हा शाखेच्यावतीने उदगीर येथे रविवार, २५ डिसेंबर रोजी धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयात आंतरभारती परिवाराचा स्नेह मिलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येतात. याप्रसंगी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब अध्यक्षतेखाली होणाऱ्या या स्नेहमेळाव्यात प्राचार्य सदाविजय आर्य उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार भारती पुणे शाखाध्यक्ष राम माने यांना, तर आंबाजोगाई आंतरभारतीचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने उपक्रमशील सहशिक्षिका ज्योती शिंदे यांना या वेळी गौरविण्यात येणार आहे.
आंतरभारतीचे संस्थापक पूज्य सानेगुरूजी यांची जयंती 24 डिसेंबरला आहे. यानिमित्ताने 25 डिसेंबर रोजी आंतरभारतीचा मेळावा होत आहे. सकाळी दहा वाजता मेळावा सुरू होईल.सकाळच्या सत्रात पुरस्कार वितरण व मान्यवरांचे मनोगत होईल. दुपारी जेवणानंतर विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे.सायंकाळी पाच वाजता मेऴाव्याची सांगता होईल. मेळाव्याला उपस्थित राहावे. सहभागासाठी अमर हबीब 8411909909, शिवलिंग मठपती 9511723393 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण
हेही वाचा : तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन
हेही वाचा : थोर संतांवर विकृत टीका : सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला सेलूतील वारकऱ्यांनी मारले जोडे
हेही वाचा : अभिनंदनीय : नूतन कन्या शाळेचे ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदेंचा ‘भारत भूषण’ ने गौरव