रौप्य महोत्सव : सेलूतील श्रीकालिकादेवी मंदिरात मंगळवारी विविध कार्यक्रम
अभिषेक, महापूजा, कृतज्ञता सोहळा मान्यवरांची उपस्थिती
सेलू जि.परभणी, १८ डिसेंबर : येथील विद्यानागर भागातील कासार समाजाचे कुलदैवत श्रीकालिकादेवी प्राणप्रतिष्ठापनेचा रौप्य महोत्सवानिमित्त मंगळवारी, २० डिसेंबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक कासार यांनी ही माहिती दिली.
दरवर्षी कासार समाज बांधव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात स्थापनेचा वर्धापनदिन साजरा करतात. यावर्षी मंगळवारी, २० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्रीकालिकादेवीला अभिषेक व महापूजा होईल. साडेदहा वाजता मान्यवरांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा आहे. दुपारी १२:४० वाजता महाआरती होईल. या सोहळ्याला खासदार संजय जाधव, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, विजयराव भांबळे, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, मारोती चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, शिवसेना गटनेते रामनाना खराबे पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल कथले,कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर, विभागीय अध्यक्ष मंगेशराव विभुते, युवा अध्यक्ष दिपकराव वनगुजरे, महिलाध्यक्ष स्मिताताई धारुरकर, जैन कासार संस्थेचे अध्यक्ष पोपटलाल डोर्ले (सांगली), प्रा.सुभाष दगडे (पुणे) प्राचार्य मैंदर्गे, जयप्रकाश दगडे (लातूर), अंकित रासने (अहमदनगर) यांच्यासह समाजातील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राधाबाई वानरे यांच्या स्मरणार्थ माधवराव वानरे यांच्याकडून महाप्रसाद, तर परभणी येथील शिवाजी शिनगारे स्वयंपाकसेवा मोफत देणार आहेत. समाजबांधवांतर्फे अल्पोपहार, चहापान व जलसेवा आहे. कार्यक्रमाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यकारी समितीचे अध्यक्ष अशोक कासार, उपाध्यक्ष रामप्रसाद वराडे, अशोक वानरे, सचिव गजानन हेलसकर, सहसचिव अनंतकुमार विश्वंभर, कोषाध्यक्ष शाम खरावणे, मार्गदर्शक शंकरराव हेलसकर, गोपाळराव सासवडे, सुनिता बाळकृष्ण हेलसकर, माधवराव वानरे, अरुण गोरे, धर्मकुमार वानरे, जीवन खरावणे, गोपाळराव नामदेवराव हेलसकर, दिलीप कुंभकर्ण, प्रभाकर ढोके, मीरा हलगे, शोभा वानरे आदींसह कासार समाज बांधव पुढाकार घेत आहेत.
विवाह सोहळ्याची परंपरा
श्रीकालिकादेवीच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी समाजातील होतकरू कुटुंबियांच्या मुला-मुलींचे विवाह मंदिर समितीतर्फे आयोजित करण्याची परंपरा यावर्षीही समितीने जपली आहे. यंदा असे दोन विवाह या उत्सवात होणार आहेत.