अकरा ग्रामपंचायतीसाठी ८४.०८ टक्के मतदान; मंगळवारी निकाल 

अकरा ग्रामपंचायतीसाठी ८४.०८ टक्के मतदान; मंगळवारी निकाल 

म्हाळासापूर ९३, तर राव्हा ग्रामपंचायतीसाठी ९२ टक्के मतदान 

सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील अकरा ग रविवारी, १८ डिसेंबर रोजी सरासरी ८४.०८ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक विभागाने सायंकाळी ही प्राथमिक माहिती दिली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७३.५७ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची प्राथमिक टक्केवारी अशी : म्हाळसापूर ९३.३६, डिग्रस जहांगीर ९०.९६, शिंदे टाकळी ८८.२७ माले टाकळी ९१.३८ टक्के, रवळगाव ७५.८३, गुगळी धामणगाव ८६.०२, डासाळा ७९.१०, राधे धामणगाव ८१.८१, बोरकिन्ही – नरसापूर ८८.०७, कुपटा ७६.११, तर राव्हा येथील मतदान केंद्रावर ९२.१५ टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीसाठीच्या ३६ मतदान केंद्रावर एकूण १८६४२ मतदारांपैकी पुरुष ८२११, तर महिला ७४६३ अशा एकूण १५६७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!