अंधश्रद्धा निर्मूलन समिती :  विवेकी जीवनशैलीची चळवळ :  डॉ. हमीद दाभोळकर

अंधश्रद्धा निर्मूलन समिती :  विवेकी जीवनशैलीची चळवळ :  डॉ. हमीद दाभोळकर

परभणी येथे व्याख्यान, मानसिक आजार : उपचार व संशोधन केंद्राचे उद्घाटन

परभणी : अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कोणत्याही देवा-धर्माविरोधात नसून, ती एक विवेकी जीवनशैली निर्माण करणारी चळवळ, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारी सदस्य डॉ.हमीद दाभोळकर यांनी परभणी येथे केले.
शुक्रवारी,16 डिसेंबर रोजी सायंकाळी डॉ.दाभोळकर यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘सुशिक्षितांची अंधश्रद्धा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक आर.रागसुधा होत्या. राज्य समिती सदस्य नंदिनी जाधव, जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र मानवतकर, लाईफ लाईनचे संचालक डॉ.रामेश्वर नाईक, विशाल जाधव, प्रा.प्रल्हाद मोरे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदिश नाईक, डॉ.परमेश्वर साळवे, डॉ.कान्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.दाभोळकर म्हणाले, ” फक्त अशिक्षितच नाही, तर अनेक सुशिक्षित लोकही अंधश्रद्धा पाळताना दिसतात. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यक्ती फक्त सुशिक्षित असून चालत नाही, तर ती चिकित्सकही असावी लागते. कोणतीही अंधश्रद्धा तयार होण्यामागे मानवी मनामध्ये अदृश्याची भीती असते. अशा भीतीमुळेच मानवी मन अस्वस्थ होते याचा फायदा भोंदू बाबा – बुवा घेतात. पीडिताचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करतात. यासाठी प्रत्येकाने चिकित्सात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. ”
अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या सर्व सामान्य लोकांना बुवाबाजी जाळ्यात अडकवले जाते. अशा परिस्थितीत कायदा आपल्या सोबत आहे, असा विश्वास श्रीमती रागसुद्धा यांनी या वेळी दिला.व्याख्यानासाठी मुंजाजी कांबळे, डॉ.सुनील जाधव, प्रा.माणिक लिंगायत, प्रा. डॉ.चंद्रकांत गांगुर्डे, राहुल खेडकर, एम.एम.बरे , प्रा.सारिका सावंत, सावित्री चिताडे, एन.आय.काळे आदींनी परिश्रम घेतले.

उपचार व संशोधन केंद्राचे उद्घाटन

परभणीतील मन हॉस्पिटलमध्ये करणी, भानामती, अंगात येणे इत्यादी मानसिक आजारांवर उपचार व संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन डॉ.हमीद दाभोळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषिभूषण कांतराव देशमुख, नंदिनी जाधव, डॉ.रवि मानवतकर, डॉ. रामेश्वर नाईक आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागातसुद्धा अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या रोग व रोगी या संदर्भात उपचारासोबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांनी या वेळी दिली.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती :  विवेकी जीवनशैलीची चळवळ :  डॉ. हमीद दाभोळकर

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!