रौप्यमहोत्सव : श्रीकालिकादेवी मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची ग्वाही
सेलूतील श्रीकालिकादेवीचा वार्षिकोत्सव उत्साहात, विविध कार्यक्रम, मान्यवरांसह भाविकांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : येथील विद्यानागर भागातील कासार समाजाचे कुलदैवत श्रीकालिकादेवी प्राणप्रतिष्ठापनेचा रौप्य महोत्सव मंगळवारी, २० डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बोलतांना माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी, कासार समाज आणि शहरातील श्रीकालिकादेवी मंदिर परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
अध्यक्षस्थानी संस्थानचे अध्यक्ष अशोक कासार होते. अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे माजी गट नेते रामनाना खराबे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंगल कथले, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, मंगेश विभुते, दीपक वनगुजरे, पुणे येथील दिगंबर जैन मंदिर संस्थान प्रा.सुभाष दगडे, राज्य सचिव नंदकिशोर शिलवंत, विलास वानरे गुरुजी, सेलू संस्थानचे माजी अध्यक्ष सुभाषराव कुंभकर्ण, जालना संस्थानचे किरण शिलवंत, हेलस संस्थानचे सतीश तळणीकर, कुंभारी संस्थानचे मारोतराव विश्वंभर, वालूरचे कैलास वानरे, जिंतूरचे अशोक उंडे, महिला प्राथमिक शिक्षक संघाच्या सेलू तालुकाध्यक्ष मीनाताई वानरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी सभापती अशोक काकडे यांनी कासार समाजाच्या कार्याचा गौरव करून भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला.
शरद भांडेकर यांनी सेलूतील कासार समाजाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे व विवाह सोहळ्याचे कौतुक केले; समाजासाठी हितासाठी मध्यवर्ती कासार समाज मंडळाने घेतलेल्या आदर्श विवाह सोहळ्यासंबंधीच्या निर्णयाची माहिती दिली. संस्थानचे अध्यक्ष अशोक कासार यांनी, सेलू शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांचे श्रीकालिकादेवी संस्थान व कासार समाजाला कायम सहकार्य मिळत आलेले आहे. याबद्दल कतृज्ञता व्यक्त केली.
या वार्षिकोत्सवात संस्थानच्या वतीने दोन विवाह सोहळे करण्यात आले. महाप्रसाद अन्नदाते माधवराव वानरे, तसेच बेबीताई कुंभकर्ण, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, विशाल कुंभकर्ण, स्वप्निल खोमाडे, रंगनाथ ढोके, संतोष महाजन, वसंतराव समेळ, मुंजा शेटे, चंद्रकांत सासवडे, लक्ष्मणराव शेटे, अंजीराम राऊत, स्वयंपाक सेवार्थी बाबा शिनगारे यांचा; तसेच गुणवंत विद्यार्थी प्रणिता कुंभकर्ण, अक्षरा हेलसकर, सिद्धार्थ ढोके आदींची या वेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनंतकुमार विश्वंभर, सूत्रसंचालन अशोक वानरे, गजानन हेलसकर यांनी केले. राजश्री विश्वंभर यांनी आभार मानले. उपाध्यक्ष रामप्रसाद वराडे, अशोक वानरे, सचिव गजानन हेलसकर, सहसचिव अनंतकुमार विश्वंभर, कोषाध्यक्ष शाम खरावणे, मार्गदर्शक शंकरराव हेलसकर, गोपाळराव सासवडे, सुनिता बाळकृष्ण हेलसकर, माधवराव वानरे, अरुण गोरे, धर्मकुमार वानरे, जीवन खरावणे, गोपाळराव नामदेवराव हेलसकर, दिलीप कुंभकर्ण, प्रभाकर ढोके, मीरा हलगे, शोभा वानरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना खरावणे, बाळकृष्ण हेलसकर, मधुकर हलगे आदींसह कासार समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
शांत,सरळ आणि नि:स्वार्थी…
शांत, सरळ आणि नि:स्वार्थी कासार समाजही कधीच आपल्या मागणीसाठी आक्रमक होत नाही. शांतपणे मागणी मांडतो. त्यामुळे विविध पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सहकार्य समाजाला मिळत असते. श्रीकालिकादेवी मंदिर परिसराच्या विकासाच्या दृष्टीने एक मोठा सभामंडप करण्याचे समाजाचे नियोजन आहे. त्यासाठी आपण निश्चित पुढाकार घेऊ, असे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी या वेळी नमूद केले.
हेही वाचा : करिष्मा कायम : रवळगावात डॉ.संजय रोडगेंचे चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व
हेही वाचा : जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत आनंदोत्सव