जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत आनंदोत्सव

जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत आनंदोत्सव

तहसील कार्यालयात शिस्तबद्ध मतमोजणी, परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

सेलू जि.परभणी : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर झाला. १८ डिसेंबर रोजी सरासरी 84 टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली, तर दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले. निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मतमोजणीसाठी प्रशासनाने १८ पर्यवेक्षक व सहायकांची नेमणूक केली होती. एकूण ९ टेबलवर ५ फेऱ्यामध्ये मतमोजणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता. मतमोजणी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.तोटेवाड, आर.आर. माने, आर.बी.बोराडे, गजानन वाघमारे, निखील गरूड, ए.एन. माटकर यांनी महत्वाची भूमिका बजावली
सरपंचपदासाठी निवडून आलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे : शिंदे टाकळी : अश्विनी कैलास पवार (भारतीय जनता पक्ष), मालेटाकळी : ज्ञानेश्वर (माऊली) कचरू ताठे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), म्हाळसापूर : कमलाकर विनायक आवटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राधे धामणगाव : व्दारका प्रकाश गोरे (इतर), गुगळी धामणगाव : अतुल भगवान डख (शिवसेना), डिग्रस (जहांगीर) : वैष्णवी चक्रधर पौळ (काँग्रेस), रवळगाव : दिपक आसाराम रोडगे (राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉ.संजय रोडगे गट), कुपटा : रुक्मिणी प्रसाद गवळी (राष्ट्रवादी काँग्रेस), डासाळा : प्रियंका दादाभाऊ बोंबले (भारतीय जनता पक्ष), राव्हा : मंदाकिनी रमेश शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), बोरकिनी : नरसापूर : कल्पना हनुमान मुसळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस).

 

उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता. मतमोजणी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.तोटेवाड, आर.आर. माने, आर.बी.बोराडे, गजानन वाघमारे, निखील गरूड, ए.एन. माटकर यांनी महत्वाची भूमिका बजावली

हेहा वाचा :  रौप्यमहोत्सव : श्रीकालिकादेवी मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे

हेहा वाचा : करिष्मा कायम : रवळगावात डॉ.संजय रोडगेंचे चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व

हेही वाचा : राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!