राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर

राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर

माजी आमदार विजय भांबळे, पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवनिर्वाचितांचा सत्कार

राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर

सेलू जि.परभणी : सेलू, जिंतूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्षाने 17 ग्रामपंचायतीत सत्ता प्रस्थापित केली आहे. सतरा ग्रामपंचायतीत सरपंच पदासह सदस्य निवडून आले आहेत. माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सेलूत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी, 20 डिसेंबर रोजी निकालानंतर विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून सत्कार केला.

सेलूतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात नवनिर्वाचित सरपंचांचा, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सरपंचपदी निव़डून आलेले मालेटाकळी-ज्ञानेश्वर (माऊली) कचरू ताठे, म्हाळसापूर- कमलाकर विनायकराव आवटे, राव्हा – मंदाकिनीताई रमेशराव शिंदे, बोरकीनी- कल्पनाताई हनुमान मुसळे, कुपटा – रुख्मिनबाई प्रसाद गवळी  यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सभापती पुरुषोत्तम पावडे, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, चंद्रकांत गाडेकर, नबाजीराव खेडेकर, नईमभाई पठाण, दिलीप आकांत, रघुनाथ बागल, राजेश राउत, उदय रोडगे, गौसलाला यांची उपस्थिती होती.

जिंतूर तालुक्यातील बारा ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे 

जिंतूर : तालुक्यातील बारा ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्षाने वर्चस्व राखले आहे. त्यात पाचलेगाव, वस्सा, नांदगाव (दु), कवठा-बदनापूर, मांडवा, वझर (बु), नवहाती तांडा, वडाळी, वडी, बामणी, असोला यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणून आले आहेत, तर मालेगाव (दु) या ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा एकत्रित उमेदवार निवडून आला आहे.
निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते पुष्पहार व पक्षाचा रुमाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, मुरलीधर मते, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, विजय खिस्ते, शरदराव मस्के, किरण दाभाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब भांबळे, मनोहर डोईफोडे, शाहेदबेग मिर्झा, उस्मान पठाण, शोएब जानिमिया, दत्तराव काळे, मनोज थिटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, रवळगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे यांच्या नेतृत्वातील डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या पॅनलने सत्ता पुन्हा राखली आहे. सरपंच दीपक रोडगे, तसेच पॅनलचे सात उमेदवार विजय झाले आहेत. डासाळा ग्रामपंचायतीतही मित्रमंडळाचे सदस्य निवडून आले आहेत. डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर

हेही वाचा : भाजपाचा झेंडा : जिंतूर, सेलूमध्ये निर्विवाद वर्चस्व; 28 ग्रामपंचायतीवर सत्ता

हेही वाचा : जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत आनंदोत्सव

हेही वाचा : करिष्मा कायम : रवळगावात डॉ.संजय रोडगेंचे चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व

हेही वाचा : रौप्यमहोत्सव : श्रीकालिकादेवी मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!