करिष्मा कायम : रवळगावात डॉ.संजय रोडगेंचे चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व

करिष्मा कायम : रवळगावात डॉ.संजय रोडगेंचे चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व

डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांंचा सेलूत जल्लोष, गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी

सेलू,जि.परभणी : सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी, २० डिसेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये अकरा सदस्यांच्या रवळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत सत्तेचा करिष्मा कायम राखला आहे, तर डासाळा ग्रामपंचायतीवरही मित्रमंडळाच्या आघाडीच्या उमेदावारांनी विजय मिळविल्या दावा डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाने केला आहे. दरम्यान, डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांंनी विजयाचा जल्लोष केला. गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

रवळगावमध्ये सरपंच व सदस्य पदासाठी अत्यंत प्रतिष्ठेची लढाई झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच दोन गट आमनेसामने भिडले होते. भारतीय जनता पक्ष प्रणित जयभवानी पॅनलही प्रचारात मुसंडी मारून प्रस्थापितांना धक्का दिला. सरपंच पदासाठी निकराची झूंज दिली. रवळगाव जिल्हा परिषद सर्कल मधील अन्य काही ग्रामपंचायतीवर डॉ.संजय रोडगे यांच्या नेतृत्वाखालील सदस्य निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. रवळगावमध्ये माजी सरपंच दीपक आसाराम रोडगे ( 843/2180 ) यांनाच मतदारांनी पुन्हा थेट सरपंचपदी बहुमताने निवडून दिले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार आत्माराम अशोक रोडगे यांना 776, तर अप्पा तुकाराम रोडगे यांना 537 मतांवर समाधान मानावे लागले. सदस्यपदाच्या विजयी उमेदवारात डॉ.संजय रोडगे मित्र मंडळाच्या प्रतिभा नाथराव रोडगे (190), विजयमाला रोहिदास मनेरे (180), सावित्राबाई शंकरराव राऊत (253), गोविंद नाथराव भदर्गे (322), उर्मिला दुर्गादास आळसे (276) व गंगुबाई शिवाजीराव सरोदे (231) यांचा समावेश आहे. प्रतिस्पर्धी पॅनलच्या विजयी उमेदवारात संतोष भुजगंराव रोडगे (242), तारामती शिवाजी गाडेकर (241), संतोष भाऊसाहेब रोडेगे (247), अशोक बालासाहेब रोडगे (190), कौशल्या मोहन रोडगे (226) यांचा समावेश आहे.

डासाळा : सरपंचपदी प्रियंका बोंबलेंचा एकतर्फी विजय 

अकरा सदस्यांच्या डासाळा ग्रामपंचायतीवर सरपंच पदाच्या उमेदवार प्रियंका दादाभाऊ बोंबले (1120/1919) यांनी एकतर्फी विजय संपादन केला आहे. सदस्यपदासाठी शारदा ज्ञानोबा कदम (214), राधा किशन बागल (219), ज्ञानोबा रोहिदास गवारे (364), अमोल पांडुरंग गजमल (359), कस्तुराबाई बाबुराव बांदल (294), प्रभाकर सुंदरराव गजमल (340), पार्वती बाबुराव गजमल (359), शेख चुनुबी शेख इद्रिस(267) हे बहुमतांनी विजयी झाल्याचा दावा डॉ संजय रोडगे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. अन्य विजयी उमेदवारात अनिल अंकुशराव गजमल (300), कैलास रमेशराव गजमल (247) सारिका श्यामराव गजमल (299) यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीतील काही प्रमुख लोकांचा विरोध असतानाही डॉ.संजय रोडगे यांनी स्वपक्षीयांशीच एक हाती टक्कर देत पॅनलला निर्णायक विजयश्री मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही डॉ.संजय रोडगे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी राहिल, हे रवळगाव व डासाळ्यातील निकालाने दाखवून दिले आहे, असे मानले जात आहे.

रवळगाव : डॉ.संजय रोडगेंचा करिष्मा कायम; चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व

हेही नाचा : राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर

हेही वाचा : रौप्यमहोत्सव : श्रीकालिकादेवी मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे

हेही वाचा : जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत आनंदोत्सव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!