भाजपाचा झेंडा : जिंतूर, सेलूमध्ये निर्विवाद वर्चस्व; 28 ग्रामपंचायतीवर सत्ता

भाजपाचा झेंडा : जिंतूर, सेलूमध्ये निर्विवाद वर्चस्व; 28 ग्रामपंचायतीवर सत्ता 

जिंतूर तालुक्यातील 22, सेलूतील 6 ग्रामपंचायती ताब्यात

जिंतूर : जिंतूर आणि सेलू तालुक्यातील एकूण 43 ग्रामपंचायत निवडणूक निकालात तब्बल 28 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी निवड झाल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण झाले आहे. यात प्रामुख्याने माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा मतदारसंघातील करिष्मा कायम असल्याचे या निकालातून दिसून येत आहे. तब्बल जिंतूर तालुक्यामध्ये 32 ग्रामपंचायती पैकी 22 ग्रामपंचायतीवर आणि सेलू तालुक्यातील 11 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायतवर भारतीय जनता पक्षाने विजय संपादित केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, कृष्णा देशमुख,सुनील भोंबे, दत्ता कटारे, मुन्ना पारवे, आत्माराम पवार, प्रदीप चौधरी, कैलास खंदारे, रामभाऊ राठोड, उत्तम जाधव, अशोक बुधवंत, मनोहर सातपुते,युवराज घनसावंत, मतीन सर ,केशव घुले व पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या ग्रामपंचायती या प्रमाणे आहेत. जिंतूर तालुका : वाघी धानोरा, माणकेश्वर,चारठाणा,देवसडी,दुधगाव,आसेगाव
,केहाळ,वरुड नरसिंह,धोपटवाडी,पिंपळगाव गायके,इटोली,साईनगर तांडा,जांब बुद्रुक,धानोरा, देवगाव,बोर्डी,सोस,देवगाव धानोरा,मालेगाव दुधना,कवडा,नांदगाव दुधना,राजेगाव,कुंभारी,मांडवा. सेलू तालुका : शिंदे टाकळी, धामणगाव, राधे धामणगाव,डासाळा,कुपटा,डिग्रस पोळ.

माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांचा दांडगा जनसंपर्क आणि जनता दरबाराच्या माध्यमातून आपण जनतेची केलेली विविध विकास कामे व पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मेहनती मुळेच हे यश संपादन झाले आहे, भाजप पुरस्कृत सर्व विजयी उमेदवारांना मी या विजयाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देते.

meghna bordikar

-आमदार मेघना बोर्डीकर, जिंतूर, सेलू

हेही वाचा : राष्ट्रवादी पुन्हा : सेलू,जिंतूरमध्ये सतरा ग्रामपंचायतीत घड्याळाचा गजर

हेही वाचा : जल्लोष : निकालानंतर विजयी उमेदवारांचा सेलूत आनंदोत्सव

हेही वाचा : करिष्मा कायम : रवळगावात डॉ.संजय रोडगेंचे चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व

हेही वाचा : रौप्यमहोत्सव : श्रीकालिकादेवी मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!