एनएमएमएस : परीक्षा सुरळीत, सेलूत 436 परीक्षार्थींची उपस्थिती
जिल्हाभरात 4939 परीर्थींची उपस्थिती, फिरत्या पथकांनी दिल्या परीक्षा केंद्रावर भेटी
सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व्दारा आयोदित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना परीक्षा (एनएमएमएस )21 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात एकूण 18 परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. 4939 परीक्षार्थींची उपस्थिती होती. परीक्षेसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळी चार पथके स्थापन करण्यात आली होती. तालुका गटशिक्षणाधिकारी यांचेही फिरते पथक कार्यरत होते. परीक्षा केंद्रावर स्वतंत्र बैठे पथक सुद्धा होते. यामुळे शिक्षण विभागाने काटेकोर नियोजन केल्याने जिल्हाभरात परीक्षा सुरळीत पार पडल्या.
सेलू येथे दोन परीक्षा केंद्रे होती. नूतन विद्यालयातील केंद्रावर 217 पैकी 216, तर केशवराज बाबासाहेब विद्यालयात पहिल्या सत्रात 219, दुसऱ्या सत्रात 218 परीक्षार्थीचे उपस्थित होते. केंद्रसंचालक मह्णून नूतन विद्यालयात उपमुख्याध्यापक संतोष पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पर्यवेक्षक किरण देशपांडे, विभाग प्रमुख विजेंद्र धापसले. संतोष क्षीरसागर यांनी साहाय्य केले. केशवराज बाबासाहेब विद्यालयात मुख्याध्यापक पी.एस.कौसडीकर केंद्रप्रमुख होते. मुख्याध्यापत सुभाष नावकर यांनी त्यांना सहाय्य तकेले. गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, प्रभारी उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ, विस्तार अधिकारी गोविंद मोरे, मुख्याध्यापक दयानंद जमशेट्ये,सहायक योजना अधिकारी बालासाहेब मुंडे यांच्यासह इतर अधिकारी, मुख्याध्यापकांचे परीक्षेसाठी सहाय्य मिळाले.