ऑल इंडिया मुशायरा : सोमवारी सेलूत नामांकित शायरांची मैफल 

ऑल इंडिया मुशायरा : सोमवारी सेलूत नामांकित शायरांची मैफल 

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम, आमदार बाबाजानी, रामनाना, सुरेश नागरेंची उपस्थिती 

सेलू (जि.परभणी) : माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळाच्या पुढाकाराने सोमवारी, २६ डिसेंबर शहरातील आठवडी बाजार परिसरात देशातील नामांकित शायरांचा मुशायरा आयोजित करण्यात आला आहे. आठवडी बाजार परिसरात सायंकाळी सात ते दहा या वेळेत शायरांची मैफल रंगणार आहे. 

अध्यक्षस्थानी विनोद बोराडे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी , माजी जिल्हा परिषद गट नेते रामनाना खराबे उपस्थित राहणार आहेत. देशातील प्रसिद्ध कवी अबरार काशिफ (अमरावती) संपत सरल (राजस्थान), वाहेद अन्सारी (मालेगाव), मुश्ताक अहमद मुश्ताक (मालेगाव), नसीम नवाझ (अकोला), अल्तमश तालेब (नांदेड), शाहेद मुंहफट (बियावल), अल्ताफ झिया (मालेगाव), अफजल दानिश (बुर्‍हाणपूर) आदी शायर सहभागी होणार आहेत. मुशायरा कार्यक्रमात रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!