अपघात विमा : वारसांना धनादेशाचे वाटप, पोलिस अधीक्षक रागसुधा यांची उपस्थिती 

अपघात विमा : वारसांना धनादेशाचे वाटप, पोलिस अधीक्षक रागसुधा यांची उपस्थिती 

दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांकडे धनादेश सुपूर्द 

परभणी : परभणी जिल्हा पोलिस कर्मचारी पतसंस्थेअंतर्गत पोलीस दलातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अपघात विमा रक्कमेच्या धनादेशाचे वाटप जिल्हा पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या हस्ते शुक्रवारी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले.  

पोलिस कर्मचारी कृष्णकुमार सरोदे व रामा कदम यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी पतसंस्थेअंतर्गत अपघात विमा काढला होता. त्याचा लाभ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळवून देण्यासाठी पोलिस अधीक्षक रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या वेळी एलआयसीचे शाखा व्यवस्थापक गणेश कदम, वरिष्ठ लिपीक दीपक जाेशी, पीएसआय माधव लोकुलवार, मकसूदखाॅ पठाण एएसआय वीरकर, एस.एस.काळे आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!