सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना 

­सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना 

सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात अभिवादन कार्यक्रम; प्रार्थना कार्डचे वाटप

परभणी : खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारताचे होवो, असा उद्दात विचार मातृ हृदयी सानेगुरुजी यांनी दिला आहे. गुरुजींचे विचार संस्कार विचार बनले आहेत आणि श्यामची आई हा ग्रंथ म्हणजे चिंतनशील संस्कारगाथा ठरला आहे, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात सानेगुरुजी जयंती निमित्त शनिवारी, २४ डिसेंबर रोजी गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर, प्रा.अर्जुन गजमल, ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडितराव जगाडे, विलास शिंदे, अनंत मोगल, बाबासाहेब हेलसकर, अनुराधा कानडे, शेख अन्सार, अनिरुद्ध टाके आदींची उपस्थिती होती.

 सानेगुरुजी म्हणजे ममत्व : प्रा.अर्जुन गजमल

प्रा.अर्जुन गजमल म्हणाले, “साने गुरुजी यांचं श्यामची आई या पुस्तकातून विद्यार्थ्यांना संस्कार, संस्कृतीचे हा ग्रंथ मातृहृदयी वात्सल्य, करुणा शिकविणारा हा प्रत्येकाच्या घरात श्यामची आई ग्रंथ गरजेचे आहे.पाल्यांना मोबाईल व्यवस्थित हाताळला की त्याचा  अधिक आनंद होतो; परंतु श्यामच्या आईने श्यामला ग्रंथ वाचनाची वेड लावले. त्यामुळे साने गुरुजी होता आले” या निमित्ताने उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांना ‘खरा तो एकचि धर्म ‘ प्रार्थना कार्डचे वाटप सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यानिमित्ताने उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी सानेगुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सानेगुरुजी यांचे छायाचित्र असलेले ‘खरा तो एकचि धर्म ‘ प्रार्थना कार्डचे वाटप सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना करण्यात आले.

*_सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना_* 🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪  https://sakashnews.com/?p=4137

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!