विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

सलग तेराव्या वर्षी प्रिन्स इंग्लिश स्कूल तालुक्यातून अव्वल

सेलू : जिल्हा परिषद परभणी आयोजित ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग तेराव्या वर्षी प्रथम येण्याचा मान प्रिन्स इंग्लिश स्कूल या शाळेने मिळविला आहे. केशवराज बाबासाहेब विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक गटातून एकूण ६० विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले होते. सेलू तालुक्यातील सर्व शाळेतील प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रिन्स इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी वरद सारडा, अभय आतकरे, कृष्णा तायनाक यांनी सादर केलेल्या ‘लाय फाय’ प्रयोगाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे. या विद्यार्थ्यांनी लाय फाय तंत्रज्ञानवर आधारित प्रयोग सादर केला. लायफाय हे दोन डिव्हाईस मध्ये डेटा हस्तांतरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले वायरलेस ऑप्टिकल नेटवर्किंग तंत्रज्ञान आहे. LiFi चे पूर्ण नाव म्हणजेच फुल फॉर्म Light Fidelity असा होतो. WiFi मध्ये डेटा हस्तांतरण साठी रेडिओ वेव्हस चा माध्यम म्हणून वापर होतो, परंतु Lifi मध्ये Light म्हणजेच प्रकाशाचा वापर केला जातो. एका अध्ययनात समोर आले आहे की Lifi हे Wifi पेक्षा १०० पटीच्या वेगाने डेटा हस्तांतरण करण्यास सक्षम आहे. लायफायची कार्यपद्धती समजावून घेण्यास खूप सोपी आहे. Lifi हे Visible Light Communication सिस्टम आहे जे अत्यंत वेगाने डेटा Transfer करण्यास सक्षम आहे. या तंत्रज्ञानात LED Light Bulb वापरला जातो. हा बल्ब ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश उत्सर्जित करतो, हा प्रकाश मानवाच्या डोळ्यांना दिसत नाही कारण तो अदृश्य स्पेक्ट्रम मध्ये असतो.

माध्यमिक गटात अब्दुल बारी अन्सारी, अधिराज ठोंबरे, उरुज खान या विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींसाठी स्मार्ट स्टिक हा प्रयोग सादर केला. भारतामध्ये दृष्टिहीनांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार तर सोडाच साधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असले, तरी अंध व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर अंधांसाठी वरदान ठरणारी ही काठी नजिकच्या भविष्यात खूप कमी पैशांमध्ये उपलब्ध होईल. यामध्ये अंध व्यक्तींसाठी अडथळ्यांपासून दूर राहण्यासाठी सेन्सर लावण्यात आले आहे. हे सेंसर अंध व्यक्तींना विना अडथळा चालण्यासाठी मदत करतील. याही प्रयोगाचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. असेच नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अबाधित ठेवली आहे. नवीन प्रयोग सादर करण्यासाठी शाळेचे विज्ञान शिक्षक नारायण चौरे, श्रीकृष्ण खरात, अमित रॉय, डॉ वेणू गोपाल जोशी यांनी मार्गदर्शन केले. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे, डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.


…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात

कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!