कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

विभागीय कथाकथन स्पर्धेची परभणी जिल्हा फेरी : सानेगुरुजी कथामाला, हेलस व जालन्याच्या मानस फाऊंडेशनचा उपक्रम 

सेलू जि.परभणी : सानेगुरुजी जयंतीनिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, हेलस व मानस फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय कथाकथन स्पर्धेची जिल्हाफेरी बुधवारी (२८ डिसेंबर) सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयात पार पडली. बालगटात सेलू येथील केनस्टार ॲकडमीच्या ज्ञानाई खवणे, तर किशोर गटात नूतन कन्या प्रशालेच्या अल्फिया कुरेशी हीने सर्वप्रथम क्रमांक पटकाविला आहे. विजेत्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

या वेळी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे, परीक्षक कवी गौतम सूर्यवंशी, रवि मुळावेकर, संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर, कीर्ती राऊत, बाबासाहेब हेलसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त ज्ञानाई खवणे व अल्फिया कुरेशी या स्पर्धकांची सात जानेवारीला आयोजित मराठवाडा विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. प्रारंभी सानेगुरुजी व दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानसी दलाल, सई कुलकर्णी, नम्रता बोराडे, समृद्धी राखे, वैष्णवी पिंपळगावकर, सानिका गझलकार यांनी ‘खरा तो एकचि धर्म’ हे गीत सादर केले. स्पर्धेसाठी जिल्हा संयोजक काशिनाथ पल्लेवाड, कीर्ती राऊत, पूजा शिंदे, सायली हेलसकर, भगवान पावडे, धनश्री देशमुख, श्रीराम रेंगे, विलास अवचार आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल असा : बालगट (पाचवी ते सातवी) : प्रथम : ज्ञानाई बापूसाहेब खवणे ( केनस्टार ॲकडमी, सेलू), द्वितीय : नंदिनी शशिकांत मालशेटवार (नूतन कन्या प्रशाला, सेलू, तृतीय : सय्यद सना शौकत (जिजामाता विद्यामंदिर, सेलू), किशोर गट (इयत्ता आठवी ते दहावी) : प्रथम : कुरेशी अल्फिया अल्ताफ, व्दितीय : दिव्या मदन गिरी, तृतीय : ऋतुजा रामप्रसाद रोडगे ( नूतन कन्या प्रशाला, सेलू)

 

किशोर गटाची (इयत्ता आठवी ते दहावी) कथाकथन स्पर्धा सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या शाळेतील स्पर्धकांनी गाजविली. स्पर्धेतील पहिले तीनही पारितोषिके नूतन कन्या शाळेने पटकावले. प्रथम : कुरेशी अल्फिया अल्ताफ, व्दितीय : दिव्या मदन गिरी, तृतीय : ऋतुजा रामप्रसाद रोडगे 


…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात

विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!