सुरभी महोत्सव : प्राॅस्पेरस, कुरियस किड्सच्या बालकलाकारांनी जिंकली मने

सुरभी महोत्सव : प्राॅस्पेरस, कुरियस किड्सच्या बालकलाकारांनी जिंकली मने

प्रिन्स अँड प्रिन्सेस पुरस्काराचे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण

सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवानिमित्त कुरियस किड्स व प्राॅस्परस पब्लिक स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम (ता.28) डिसेंबर रोजी विद्याविहार संकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

अध्यक्ष म्हणून संस्थेचे मार्गदर्शक रामराव रोडगे हे होते. सुरभि महोत्सवाचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, डॉ.ऋतुराज साडेगावकर, रंजीत गजमल, पंकज गोरे, संभाजी अवचार, वसंतराव जाधव,  सखाराम लगट संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राॅस्परस पब्लिक स्कूलच्या प्राचार्य  प्रगती क्षीरसागर, कुरीयस किड्सच्या प्राचार्या रोझ मॅडम, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, प्रा. कार्तिक रत्नाला आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य प्रगती क्षीरसागर यांनी केले. या ठिकाणी शाळेमधील सर्वोत्कृष्ट प्रिन्स अँड प्रिन्सेस हा पुरस्कार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुरीयस किड्सच्या चिमुकल्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या गाण्याचे सादरीकरण उत्कृष्ट प्रकारे केले. या ठिकाणी हजारोच्या संख्येने पालकांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका ताठे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले


…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात

विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!