क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात
सरपंच संजय साडेगावकर, संचालक अजिंक्य नखाते सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : विमुक्त जाती भटक्या जमाती च्या सेलू जिंतूर व परभणी तालुक्यातील आश्रमशाळेच्या खेळाडुंची व्हॉलीबॉल, धावणे व गोळाफेक स्पर्धा २८ डिसेंबर रोजी श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळा वालूर येथे घेण्यात आली. या स्पर्धा सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांच्या संयोजनाखाली घेतल्या गेल्याने जवळपास २४ वर्षानंतर झालेल्या या स्पर्धेस खेळाडुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच संजय साडेगावकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाल्मिकी शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य नखाते हे होते, तर सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण निरिक्षक तुकाराम भराड, जिल्हा क्रीडा संयोजक,ईटोलीचे मुख्याध्यापक किशन पुंड, केंद्रप्रमुख दतात्रय रोकडे,पांडुरंग रोकडे,पंच संभाजी शेवटे यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलतांना अजिंक्य नखाते म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य ठणठणीत राहुन शारीरिक, बौध्दिक व मानसिक विकास वृध्दिंगत करण्यासाठी शालेय वयात खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले, तर सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी बोलतांना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रिडा व सांस्कृतिक या उपजत कला गुणांना वाव मिळावा. विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळून आपले आरोग्य सदृढ रहावे या उद्देशाने सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थी या खेळाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आशा स्पर्धा दरवर्षी घेऊ असे त्या म्हणल्या. मान्यवरांचे हस्ते वालूर व चारठाणा संघादरम्यान पहिला व्हॉलीबॉल सामन्याचा टाँस करून हा सामना खेळविण्यात आला. यावेळी चारठाणा, सोहमगड, ईटोली, दर्गा पारवा परभणी, साडेगांव, वालूर येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून व्हॉलीबॉल ,धावणे व गोळाफेक या खेळप्रकारात चमकदार अशी खेळी खेळली. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्याम मचाले यांनी केले. सूत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले, तर प्राचार्य रमेश नखाते यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व वसतीगृह कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान, स्पर्धास्थळी सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांना खेळाचा मोह आवरला नाही. त्यांनीही विद्यार्थ्यांना हॉलीबॉल व गोळाफेकचे चमकदार खेळ खेळून दाखवला.
स्पर्धास्थळी सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांना खेळाचा मोह आवरला नाही. त्यांनीही विद्यार्थ्यांना हॉलीबॉल व गोळाफेकचे चमकदार खेळ खेळून दाखवला.
विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम
…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम