निबंध लेखन स्पर्धा : डॉ.अशोकराव जोगदंड स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धा उत्साहात

निबंध लेखन स्पर्धा : डॉ.अशोकराव जोगदंड स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धा उत्साहात

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारोतिषक वितरण

सेलू जि.परभणी :  संगणक , मोबाईल व ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात मुलांच्या लेखन वाचन या शिक्षणातील मूळ क्रियांना गतीमान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखन व वाचन कौशल्य विकसित करावे, असे आवाहन डॉ.अनिकेत जोगदंड यांनी केले.
येथील राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता बालविद्या मंदिर येथे संस्थापक अध्यक्षडॉ.अशोकराव जोगदंड स्मृतिदिनानिमित्त  बुधवारी, 28 डिसेंबर रोजी आंतर शालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तुळजाभवानी अर्बन बँकचे व्यवस्थापक दिपक पवार, सचिव डी.व्ही. मुळे, सहसचिव बाबासाहेब चारठाणकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात कै.अशोकराव जोगदंड यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती ल ला रा नूतन कन्या प्रशालेची कु.रासवे ज्ञानेश्वरी आसाराम, व्दितीय यशवंत विद्यालय, सेलू येथील कु.आळसे अक्षता राधाकिशन तर तृतीय क्रमांक न्यू हायस्कूल सेलूची कु .मगर दुर्गा नामदेवराव तर प्रोत्साहन पर जिजामाता प्राथमिक शाळेची कु.धबडगे पूनम महेंद्र यांनी यश मिळवलेया प्रसंगी दिपक पवार, कीर्ती राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.यशस्वी स्पर्धकांना सौ कीर्ती राऊत, सौ.देशमुख , राम गाडेकर, चौधरी विजय यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्तावीक मुख्याध्यापक रविंद्र पाठक, सूत्रसंचालन मंगेश शेळके तर आभार भगवान पावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती काळे विजयमाला, श्री खापरखुंटीकर कृष्णकांत, श्री कटारे विष्णू, सुनील राठोड, बाळु धनवे, सादेखा तसेच तुकाराम अंभूरे यांनी परिश्रम घेतले, खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .


…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात

विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

सुरभी महोत्सव : प्राॅस्पेरस, कुरियस किड्सच्या बालकलाकारांनी जिंकली मने

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!