सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण

सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण

दीपक कुलकर्णी, राहुल कांबळे, मानव गजमल, रुचिता गोंडगे विशेष पुरस्काराने सन्मानित

सुरभी महोत्सव : 'रंग मराठी मातीचा'मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील 'ज्ञानतीर्थ'चे सादरीकरण

सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवाl ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेॆल्या ‘रंग मराठी मातीचा’  या सांस्कृतिक कार्यक्रमाने बुधवारी, 28 डिसेंबर रोजी प्रेक्षक दंग झाले.

महाराष्ट्र राज्याचे उच्च माध्यमिक व क.म.वि.शिक्षक-शिक्षकेतर संघनेचे राज्याध्यक्ष दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, सुरभी महोत्सवाचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, बाळासाहेबांची शिवसेनेचे परभणी जिल्हाप्रमुख व्यकंटराव शिंदे, डॉ.रामरावजी रोडगे, महाराष्ट्र राज्याचे उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघनेचे राज्यउपाध्यक्ष राहुल कांबळे, नगर परिषदेचे माजी अध्यक्ष पवन आडळकर, परभणी ग्रामीण भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष जयसिंग शेळके, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पवन घुमरे, स्वाभिमानी शिक्षक सघटनेचे सुनील महाडिक, शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक हरी ठोंबरे, जगदीस भगस, रवळगावचे सरपंच दीपक रोडगे, सिद्धनाथ बोरगावचे सरपंच अशोक लीपणे पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा प्रियंका जयस्वाल, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, अदित्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश सोळंके शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रतिवर्षी प्रमाणे इयत्ता १० वर्गातून मानव गजमल या विद्यार्थ्याला बेस्ट युवराज तर रुचिता गोंडगे हिला बेस्ट युवराज्ञी या पुरस्काराने संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर मुंबई येथे ६०,००० शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करत आपल्या न्याय हक्कासाठी लढा देणारे महाराष्ट्र राज्याचे उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघनेचे राज्याध्यक्ष दीपक कुलकर्णी व राज्यउपाध्यक्ष राहुल कांबळे यांना “गौरव संघर्ष योध्याचा” या पुरस्काराने संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपास्थितीत सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम या सुरभी महोत्सवातून करत असल्याचे दिसून येत आहे. सेलू शहर हे मराठवाडयाची सांस्कृतिक राजधानी असून श्रीराम प्रतिष्ठाने आपल्या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामधून सेलू शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज समोर बसलेल्या चिमुकल्यामध्ये उगवते अभिनेते, डॉक्टर , इंजिनियर्स दिसून येत आहेत. उपस्थित पालकांना विनंती की विद्यार्थ्यांना खेळ सांस्कृतिक कार्यक्रम भाषण उतरवले पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. संस्कारची जडणघडण कश्यापद्धतीने करावयाची हे या शाळेतून दिसते. असे प्रतिपादन दीपक कुलकर्णी यांनी केले.
पवन आडळकर बोलताना म्हणाले की, सुरभि महोत्सव हा श्रीराम प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम असून डॉ. संजय रोडगे यांनी शैक्षणिक वातावरणास चांगले वळण देत सेलू शहराचा सांस्कृतिक वारसा जपत असतांना दिसत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम जवळपास कुठे होत असेल असे मला वाटत नाही.
डॉ. संजय रोडगे यांनी संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य केल्याचे आज या विद्यार्थी रूपी वटवृक्षातून दिसुन येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल मी अभिनंदन करतो. पालकांनी आपल्या पाल्यांना सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी केले पाहिजे. असे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे म्हणाले.
यावेळी ३०० हुन अधिक बालकलाकारणी आपल्या कलाप्रकारातून महाराष्ट्रातील सर्व सांस्कृतिची ओळख करून दिली. यामध्ये गोंधळ, धनगर गीत, शेतकरी गीत कोळी गीत, आदिवासी नृत्य, होळी नृत्य, वारकरी गीत, लावणी आदी महाराष्ट्रातील लोकधारावर आधरित विविध सामुहिक नृत्याचे बालकलाकारांनी सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, पालक सेलू शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके यांनी केले. सूत्रसंचालन संजय ठाकर, दिगंबर टाके व संदीप आकात यांनी केले तर आभार प्रदर्शन रवि रोडगे यांनी केले.

या वेळी बोलताना माजी नगराध्यक्ष पवन आडळकर म्हणाले की, सुरभि महोत्सव हा श्रीराम प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम असून, डॉ. संजय रोडगे यांनी शैक्षणिक वातावरणास चांगले वळण देत सेलू शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न शहराचा लौकिकात निश्चितच भर घालणारा आहे.

…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात

विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

सुरभी महोत्सव : प्राॅस्पेरस, कुरियस किड्सच्या बालकलाकारांनी जिंकली मने

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!