कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर

कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर

अशोक काकडे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे मांडली कैफियत

सेलू जि.परभणी : गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाकडून दिव्यागांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात सरसकट हजार रूपये कपात केल्याने शहरातील दिव्यागांच्या भावना तीव्र आहेत. कपात केलेल्या अनुदानावर मुख्याधिकारी देवीदास जाधव यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे कपात अनुदान लाटले गेले आहे का ? असा थेट आरोप दिव्यांग संघटनेकडून केला जात आहे. नगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या पाच टक्के निधीला कात्री  लावून वेळेवर अनुदान वाटप होत, नसल्याने बुधवारी, 28 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष दिव्यागं संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेलू नगरपालिकेच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून अनेक प्रश्न उपस्थित केले. पालिकेच्या वार्षिक उत्पन्नातून पाच टक्के निधी शहरातील दिव्यांगाना वाटप केला जातो. मात्र, काही वर्षांपासून करोनाचे कारण देऊन वाटप करण्यात येणाऱ्या निधीतून कपात केली जात आहे. वेळेवर दिव्यांग बांधवांना निधीचे वाटप होत नाही. प्राप्त माहितीनुसार कमाल चार ते किमान दोन हजार रूपये प्रमाणे पालिकेकडून पाच टक्के निधीतून दरवर्षी वाटप केले जाते. मात्र, करोना काळात वसुली थकीत असल्याने पालिकेचे उत्पन्न घटल्याने दिव्यांगांना वाटप करण्यात येणाऱ्या रक्कमेत एक हजारांची कपात करण्यात आली आहे. कपात करूनही वेळेवर अनुदान मिळत नसल्याने बुधवारी माजी सभापती अशोक काकडे यांच्या नेतृत्वात शहरातील अनेक दिव्यांग बांधवानी पालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांना भेटून कैफियत मांडली. पालिका इतर कामावर खर्च करत आहे. मात्र, दिव्यांगाना निधी वाटप करतानाच काटकसर करते? असा प्रश्न दिव्यांग संघटनेने उपस्थित केला. अनुदान मिळेल यासाठी  दिव्यांग बांधव ॲटो करून पालिकेत चकरा मारत आहेत. पंरतु,  पालिकेकडून प्रतिसाद मिळत नाही. तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो.  त्याच दिवशी अनुदान वाटप करणे अपेक्षित होते. मात्र पालिक कडून दुर्लक्ष केले गेले.  यावेळी काकडे यांनी दिव्यांग यांच्यासाठी शहरात दिव्यांग भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शहरात जवळपास ३७० दिव्यांग बांधवाची संख्या आहे. दरम्यान, ३० डिसेंबर पर्यंत प्रत्येक दिव्यांगाच्या बॅक खात्यावर अनुदान जमा केले जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी दिली. या वेळी किशोर साळवे,  पठाण अबरार, शेख अबरार, पप्पू चव्हाण, शंकर गात, जावेद पठाण, अक्षय पवार, विनोद खाडे, सदाशिव राखुडे,  इम्रान कुरेशी,  माजिद बागवान, ज्योती गायकवाड, जनाबाई चव्हाण, संगीता पवार,  रेखा चव्हाण, संगीता मोरे आदी उपस्थित होते.

दिव्यांगाना पालिेकेच्या स्व उत्पन्नातून पाच टक्के अनुदान मिळते. 40-80 अपंगत्वासाठी 2000 रूपये, 60-80 अपंगत्वासाठी 3000 रूपये, तर 80-100 अपंगत्वासाठी 4000 रूपये अनुदान दिले जाते. 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षाचे अनुदान लाभार्थींना मिळाले आहे. परंतु 2020-21 व 2021-22 या दोन वर्षाच्या अनुदानात प्रत्येकी 1000 रूपये कापत केले आहेत. ते अद्याप मिळाले नाही. अपंग असूनही सारख्या चकऱ्या मारव्या लागतात. सहानुभूती दाखविण्याऐवजी उद्धटपणाची भाषा वापरून दिव्यांगांना अपमानित केल्याचे प्रकार प्रशासनाकडून घडत आहेत. पालिकेला उत्पन नाही म्हणतात. म्हणून अनुदानात कपात केली आणि उत्पन्नही सांगत नाहीत. कपात करायला का पालिका प्रशासनाला अपंग, दिव्यांगच दिसतात. कपात न करता सर्व अनुदान तातडीने दिव्यांगांना देण्यात यावे अशी मागणी आहे. 

किशोर साळवे, अध्यक्ष संघर्ष दिव्यांग संघटना, सेलू तालुका 

सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण

…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात

विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

सुरभी महोत्सव : प्राॅस्पेरस, कुरियस किड्सच्या बालकलाकारांनी जिंकली मने

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!