माधवानंद स्वामी : महाराजांचा अमृत महोत्सव उत्साहात; सेलूत विविध कार्यक्रम 

माधवानंद स्वामी : महाराजांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात; सेलूत विविध कार्यक्रम 

विश्वांभर दर्शन सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शिष्यगणांची मोठी उपस्थिती­

माधवानंद स्वामी : महाराजांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात; सेलूत विविध कार्यक्रम 

सेलू जि.परभणी : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती पूज्य माधवानंद स्वामी महाराज यांचा अमृतमहोत्सवी सोहळा सेलू ( जि.परभणी) येथे गुरुवारी (२९ डिसेंबर) विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. भक्तांची मोठी गर्दी जमली होती.‌ 

उमरखेड संस्थानचे सद्गुरू वामनानंद स्वामी यांचा; तसेच मठाधिपती माधवानंद स्वामी यांचा मोठा शिष्य परिवार सर्वदूर आहे. स्वामीजींच्या आगमनापासून गेल्या दहा दिवसांत विविध कार्यक्रम झाले. गुरुवारी रेणुका मंगल कार्यालयात सकाळी सात वाजल्यापासून, स्वामीजींच्या दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत सद्गुरूंची पाद्यपूजा झाली. शर्करा, श्रीफळ तुला व रौप्यतुलेनंतर पुष्पवृष्टीने स्वामीजींना नमन करण्यात आले. गुलाब, मंजुळा, पान फुले आदींनी महाराजांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. विश्वांभर दर्शन सोहळा, महाआरती व महाप्रसादाने (पुडी) सांगता झाली. परभणी, जालना, औरंगाबाद, सेलू, मंठा, परतूर, जिंतूर, पाथरी, मानवत, गंगाखेड, परळी, माजलगाव, सोनपेठ तालुक्यासह पंचक्रोशीतील शेकडो शिष्य व भक्तगणांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सेलू येथील शिष्य परिवाराने पुढाकार घेतला.

 


हेही वाचा :

कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर

सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण

…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम

क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात

विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम

कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!