राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या नेतृत्वातील महाराष्ट्र संघ विजेता; तीन खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
शिवकन्या काळे, गीता माघाडे , लता घोगरे ठरल्या सुवर्णपदकाच्या मानतरी, संस्थेकडून सत्कार
सेलू, प्रतिनिधी : हसन कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल सबज्युनियर व सिनियर मुला-मुलींचा स्पर्धा 27 ते 29 डिसेंबर रोजी झाल्या. राष्ट्रीय डॉजबॉल सबज्युनियर मुलींचा संघात एलकेआरआर प्रिंन्स इंग्लिश ( CBSE ) स्कूल सेलूच्या विध्यार्थीनी शिवकन्या ज्ञानदेव काळे , गीता अंकुश माघाडे, लता ज्ञानदेव घोगरे यांचा महाराष्ट्र संघात समावेश होता. संघाचे प्रतिनिधित्व प्रिंन्स इंग्लिश स्कूलच्या शिवकन्या काळेने केले. महाराष्ट्र संघानी प्रथम क्रमांक मिळाला.
महाराष्ट्र संघांनी गटातील केरळ, हरियाणा,राजस्थान,आंध्रप्रदेश व तामिळनाडू याना मोठया गुणांनी नमवित अंतिम सामना फेरीत धडक मारली. यामध्ये गीता अंकुश माघाडे व शिवकन्या ज्ञानदेव काळे याचा सिंहाचा वाटा आहे.
अंतिम सामना मध्यप्रदेश सोबत खेळत असताना पहिल्या फेरीत मध्यप्रदेश 2 गुण व महाराष्ट्र 6 गुण असून महाराष्ट्र संघ हा 4 गुणाने पुढे असून दुसऱ्या फेरीत मध्यप्रदेश 1 गुण व महाराष्ट्र 4 गुण होते.एकंदरीत पूर्ण खेळात मध्यप्रदेश 3 गुण व महाराष्ट्र 10 गुण असे सूत्र होते.महाराष्ट्र संघाने पहिल्या फेरीत 4 गुणाने आपली बढती ठेवून दुसऱ्या फेरीत देखील 3 गुणाची बढत कायम राखून मध्यप्रदेश संघाला पराजीत केले.अंतिम सामन्यात देखील शिवकण्या ज्ञानदेव काळे चे 5 गुण व गीता अंकूश माघाडे चे 3 गुण महत्त्व पूर्ण ठरून महाराष्ट्र संघांनी सुवर्णपदकावर नाव नोंदवल
सबज्युनियर मुली महाराष्ट्र संघ :- शिवकन्या काळे ( एलकेआरआर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू ) , गीता माघाडे ( एलकेआरआर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू ) , लता ज्ञानदेव घोगरे ( एलकेआरप्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू ) सृष्टी अकोलकर ( औरंगाबाद ) , सिध्देश्वरी कपटे ( औरंगाबाद ) , समृद्धी शिंदे ( रायगड ) , दुर्बी मलिक ( मुंबई उपनगर ) , अंजली सातपुते ( औरंगाबाद ) , तपस्या दुबे ( रायगड ) , रिया तांबूस ( औरंगाबाद ) , गौरी पवार ( मुंबई उपनगर ) , स्नेहा पवार ( औरंगाबाद ) , हर्षदा कोलते ( औरंगाबाद )
एलकेआरआर प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलूचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी महाराष्ट्र संघाने यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच अक्षय साळवे ( क्रीडाशिक्षक ) ,बालाजी कटारे (क्रीडाशिक्षक) आणि निवड झालेल्या सर्व विद्यार्थीनीचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, डॉ आदित्य रोडगे, डॉ रामराव रोडगे,एल के आर आर प्रिंन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रॉसपरस पब्लिक स्कूल च्या प्राचार्य प्रगती क्षिरसागर, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, आदिवासी प्रकल्प विभागाचे प्राचार्य नारायण रोडगे, उप प्राचार्य श्रीकृष्ण खरात आदी उपस्थित होते. यशाबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
हेही वाचा ;
कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर
सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण
…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम
क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात
विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम
कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम