सुरभी महोत्सव : तरूणाईच्या जल्लोषात प्रेक्षक दंग; सांस्कृतिक उत्सव ठरला लक्षवेधी
सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचे आयोजन, विविध कलाप्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण
सेलू, प्रतिनधी : श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सव 2022 अंतर्गत जल्लोष तरुणाईचा या महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमात शुक्रवारी, 30 डिसेबर रोजी प्रेक्षक दंग झाले होते. कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सविताताई रोडगे, प्रा.अरविंद राठोड, जेष्ठ पत्रकार राम सोनवणे, नानासाहेब पवार, गोविंद शेळके, कैलास काळे, डॉ. दत्तात्रय नंद, डॉ.मानधने, स्वाती काकडे, कैलास मलवडे, शिवानी मलवडे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, प्राचार्य डॉ.बबन सोनवणे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे, प्राचार्य श्री.कार्तिक रत्नाला, प्राचार्या सौ. प्रगती क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ.संजयजी रोडगे म्हणाले की, सेलू व सेलू परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे द्वार खुले व्हावे व भविष्यामध्ये रोजगारांच्या संधी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात या एकमेव हेतूने अपूर्वा पॉलीटेक्निक या व्यावसायिक अभ्यासक्रम देणाऱ्या महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली. दरवर्षी या महाविद्यालयातून शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आपल्या स्वतःच्या पायावर व रोजगाराभिमुख बनत आहेत यातच आम्हाला आनंद आहे. प्रा.अरविंद राठोड म्हणाले, की डॉ. संजय रोडगे यांनी सेलू सारख्या ठिकाणी हे व्यावसायिक शिक्षण सुरू करून जी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल आम्ही सेलूकर सदैव ऋण राहू.
डॉ. संजय रोडगे यांनी अगदी सात विद्यार्थ्यापासून सुरू केलेली इंग्लिश स्कूल आता मोठ्या वटवृक्षामध्ये पसरली आहे येथील गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा खूप उंचावलेला आहे, असे डॉ.गोविंद शेळके आपल्या मनोगतात म्हणाले.
श्रीराम प्रतिष्ठान ही संस्था नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमशील शिक्षण देणारी संस्था असून शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये राज्य पातळीवरती संस्थेचे नाव आहे. आम्हाला नेहमी या संस्थेकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते, असे आपल्या मनोगतात मुख्याध्यापक नानासाहेब पवार म्हणाले.
दरम्यान, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे जल्लोष दाखवत तरुणाईला आपल्या तालावर ठेका धरायला लावून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव व प्रा. सौ ऋचा वैद्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.अर्जुन पवार यांनी केले.
सेलू व सेलू परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे द्वार खुले व्हावे व भविष्यामध्ये रोजगारांच्या संधी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात या एकमेव हेतूने अपूर्वा पॉलीटेक्निक या व्यावसायिक अभ्यासक्रम देणाऱ्या महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली. दरवर्षी या महाविद्यालयातून शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आपल्या स्वतःच्या पायावर व रोजगाराभिमुख बनत आहेत यातच आम्हाला आनंद आहे.
-डॉ.संजय रोडगे, अधयत्र श्रीराम प्रतिष्ठान, सेलू जि.परभणी
हेहा वाचा : विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है…
हेही वाचा : शैक्षणिक सहल : विवेकानंद शाळेची क्षेत्रत्रेट; येलदरी, नेमगिरी परिसराला भेट