शैक्षणिक सहल : विवेकानंद शाळेची क्षेत्रत्रेट; येलदरी, नेमगिरी परिसराला भेट
ऐचिहासिक, प्राचीन स्थळांची घेतली माहिती
सेलू, प्रतिनिधी : करोना संसर्गामुळे पर्यटनापासून दुर राहिलेल्या शालेय विद्यार्थ्यांना यंदा सहलीद्वारे क्षेत्रभेटीता आनंद घेता येत आह. याच पार्श्वभूमीवर येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयाची 30 डिसेंबर एक दिवसीय शैक्षणिक सहल अतिशय उत्साहात काढण्यात आली. यैलदरी येथील जसाशय परिसर तसेच विद्युत्त निर्मिती केंद्र पाहातांना मनमुराद आनंद घेतला.. मेमगिरी येथील प्राचीन जैन मंदिर,तेथील वास्तूकला अनुभवाता आली. शालेय अभ्यासक्रमाबरोबर भौगोलिक माहिती व ऐतिहासिक स्थळांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नेमगिरी येथील तीर्थक्षेत्राविषयी बन्सीलाल गोरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. श्री.संचारेश्वर विद्यालयाचे कार्यवाह रवीकुमार पेशकार यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची सोय केली. सहली द्वीर् ऐतिहासिक स्थळांचा वारसा आपल्याला लाभला आहे याची विद्यार्थ्यांना ओळख झाली. येलदरी येथील धरण तसेच त्याची पाणी पातळी, शेतीसाठी व औद्योगिक कारणासाठी पाण्याचा उपयोग कषाप्रकारे होतो, हे विद्यार्थ्यांना समजले. स्थानिक समितीचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेलुरकर ,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सहल यशस्वीतेसाठी नपख्याध्यापक शंकर शितोळे , सहल प्रमुख अभिषेक राजूरकर, रागिणी जकाते, अनिल कौसडीकर . विनोद मंडलिक, गजानन साळवे ,विजय चौधरी, काशिनाथ पांचाळ ,शारदा पुरी, स्वप्नाली देवडे ,सोनाली जोशी, हनुमान थोरात यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है…
हेही वाचा ; सुरभी महोत्सव : तरूणाईच्या जल्लोषात प्रेक्षक धुंद; सांस्कृतिक उत्सव ठरला लक्षवेधी