टेनिसव्हॉलीबॉल : राज्य क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन थाटात; सेलूतील फ्रेंडस् कल्बचे आयोजन
क्रीडा ज्योत प्रज्वलित करीत आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल खेळाडूंचे दिमाखदार पथसंचलन
सेलू, प्रतिनिधी : टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने फ्रेंडस् क्लब, सेलू व परभणी जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने २४ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी, 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पार थाटात संपन्न झाला.
या स्पर्धेत राज्यातील २२ जिल्ह्यातील पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत. सहभागी संघाची भोजन व्यवस्था व निवास व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रकाश झोतात दोन क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत.
आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल खेळाडूच्या हस्ते ज्योत व पथसंचलन, दांडपट्टा, तलवारबाजी, लेझीम पथकांनी शहरवासियांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल महासंघाचे महासचिव डॉ.व्यंकटेश वांगवाड, उद्घाटक नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ लहाने, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद बोराडे, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, साईबाबा बॅकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.माधव शेजुळ, क्रीडा महर्षी राज्य फुटबॉल संघटक प्रा.मंहमद इकबाल, विभागीय सचिव रामेश्वर कोरडे, राज्य सदस्य संजय ठाकरे, शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्पर्धेत सहभागी जिल्हा संघ परभणी, बीड, हिंगोली, पुणे अकोला, मुंबई उपनगर, नांदेड. वाशिम, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, नंदुरबार, जालना, नाशिक, परभणी मनपा, नागपूर मनपा, यवतमाळ ,लातूर, कोल्हापूर, सोलापूर मनपा, चंद्रपूर, अमरावती यांचा समावेश आहे. स्पर्धेत परभणी. लातूर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा संघांची विजयी घोडदौड सुरू आबे,
पंच म्हणून किरण घोलप ,राहुल पेटकर, सुनील हिवाळे, संतोष शिंदे सिद्धांत लिपने ,निनाद रहाटे गणेश पाटील का पाहात आहेत.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परभणी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, कार्याध्यक्ष विनोदराव बोराडे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत बोराडे, आयोजन समितीचे सचिव ओमप्रकाश तोष्णीवाल, राज्य महासचिव गणेश माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बोराडे, गिरीष लोडाया, राजेश गुप्ता, रविंद्र कुलकर्णी, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर ,प्रा.नागेश कान्हेकर जिल्हा सचिव सतिश नावाडे, डी.डी.सोन्नेकर, प्रशांत नाईक , नंदलाल परताणी, मदनलाल करवा, ज्ञानोबा आण्णा बोराडे, जुगलकिशोर बाहेती, भाऊसाहेब केवारे, तुकाराम बोराडे, भास्कर बोराडे, राजेंद्र बोराडे, शाम झंवर, उध्दव पवार, रविंद्र केवारे, सुरेंद्र गिल्डा, अतुल बोराडे, जिकर भॉई, पंकज सोनी, किशोर ढोके आदी परीश्रम घेत आहेत.
हेही वाचा :
कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर
सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण
…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम
क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात
विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम
कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी