सुरभी महोत्सव : देशप्रेमाने भारावलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद; सेलूतील ‘प्रिन्स सीबीएसई’चा सांस्कृतिक कार्यक्रम
शिवम शिंदे “प्रिन्स ऑफ द स्कूल”, तर समृद्धी काकडे “प्रिन्सेस ऑफ द स्कूल” पुरस्काराने सन्मानित
सेलू, प्रतिनिधी : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सुरभी महोत्सवात एलकेआररोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचा “आजादी का अमृत महोत्सव” हा सांस्कृतिक कार्यक्रम राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाने भारावलेला होता. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांची प्रंचड दाद मिळाली.
गुरूवारी, 29 डिसेंबेर विद्याविहार संकुल येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाथरी येथील श्री रेणुका शुगर्स प्रा.लिचे एम.डी.उमाकांत पौळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, परभणीचे जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोकनाना काकडे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत शिक्षण विस्तार अधिकारी,गजानन वाघमारे, पत्रकार मोहन बोराडे, विलास शिंदे, भुजंग थोरे, भूषण कासट, प्रफुल विनायके, कैलास काळे, डॉ.भक्ती नंद डॉ.दत्तात्रय काकडे डॉ.अतुल भाले डॉ.नितीन मानधने, नितीश दगडू, डॉ.प्रताप शिंदे, प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या वर्षी दहावी वर्गातून शिवम शिंदे या विद्यार्थ्याला “प्रिन्स ऑफ द स्कूल” वसमृद्धी काकडे या विद्यार्थिनीला “प्रिन्सेस ऑफ द स्कूल” या पुरस्काराने त्यांच्या पालकांसमवेत डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी वरद सारडा, अभय अतकरे, कृष्णा तायनाक, अब्दुल बारी भुसारे,अधिराज ठोंबरे,, उरूज खान या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालक व मार्गदर्शक विज्ञान शिक्षकांसमवेत सत्कारित करण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात बालकलाकारांनी स्वातंत्र्यसंग्रमातील शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्यावर नाटिका सादर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखान वध हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा ठरला. देशभक्तीपर ‘ए मेरे वतन के लोगो, वो देश मेरे, कहते है हमको प्यार से इंडियावाले, देश रंगीला रंगीला, चक दे इंडिया, सुनो गौर से दुनियावालो गीतावर समूह नृत्य सादर करण्यात आले.
डॉ संजय रोडगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची मान्यता आणली, जागतिक दर्जाची शाळा उभारून, अत्यल्प फीमध्ये या ठिकाणी शिक्षण ज्ञानदानाचे काम होत आहे. ही खूप कौतुकाची बाब आहे, असे अशोकनाना काकडे यांनी या वेळी नमूद केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम या सुरभी महोत्सवातून करीत असल्याचे दिसून येत आहे. संस्काराची जडणघडण कश्यापद्धतीने करावयाची हे या शाळेतून दिसते, , असे प्रतिपादन उमाकांत पौळ यांनी केले. प्रास्ताविक प्रगती क्षीरसागर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना ठाकूर, कल्पना भाबट, अर्जुन राठोड यांनी केले तर आभार कार्तिक रत्नाला यांनी मानले.
अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर ही शाळा काम करत असते. या शाळेत विविध नवीन्यपूर्ण उपक्रम डॉ संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात. डॉ रो़डगे यांचे आणि विद्यार्थ्यांचे जवळचे नाते निर्माण झाले आहे., असा शाळेचा अध्यक्ष कुठेही पाहायला मिळत नाही. जो विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देतो. असे मोहन बोराडे यांनी मनोगतात सांगितले.
लोकांना वाटते मी खूप काही केलं आहे, पण मी एवढ्यावर समाधानी नाही, मला अजून माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप काही करायचे आहे. मी ते सतत अविरत करण्याचा प्रयत्न करत आहे. आज श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत सर्वच क्षेत्रात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व यशस्वी होत आहेत. ही सेलूवासि्यांसाठी खूप अभिमानाची बाब आहे, अशा भावना डॉ संजय रोडगे यांनी या वेळी व्यक्त केल्या.
हेही वाचा :
कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर
सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण
…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम
क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात
विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम
कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम