विज्ञान प्रदर्शन : सेलूीतल केशवराज विद्यालयात बालवैज्ञानिकांचा मेळा; 60 प्रयोगांचे सादरीकरण
गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, संस्थेचे सचिव महेश खारकर आदींची उपस्थिती, प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी
सेलू, प्रतिनिधी : सेलूच्या पंचायत समिती शिक्षण विभाग व श्री केशवराज बाबासाहेब विदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरूवारी 29 डिसेंबर रोजी केशवराज बाबासाहेब विद्यालयात तालुकाभरातून आलेल्या बालवैज्ञानिकांचा मेळा जमला होता, विविध प्रयोगाच्या सादरीकरणातून बाववैज्ञानिकांनी आपल्या कल्पकतेचे व सृजनशील, संशोधकवृत्तीचे दर्शन घडविले.
या वेळी केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश खारकर, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत संस्थेचे सदस्य जयंत दिग्रसकर, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख गजानन भित्ते, परीक्षक कवडे, जाधव, आकात, मिलिंद झमकडे, मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, सुभाष नावकर, अंजली पद्माकर ,सुनीता काळे, आमले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिकांची माहिती रंजक रितीने विचारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच श्री केशवराज बाबासाहेब विदयालयाने कमी वेळेत छान आयोजन केले त्या बद्दल संस्थेचे कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की,विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो तसेच काहीतरी नाविन्यपूर्ण करावे असे त्यांना वाटते. या पुढच्या काळात देखील असेच विज्ञान प्रदर्शन शाळांतर्गत आयोजित करण्यात यावेत जेणे करून या स्पर्धेच्या युगात आपण परिपूर्ण विद्यार्थी बनवू शकू यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात जयंत दिग्रसकर यांनी असे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येतील व त्यासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देणार असल्याचे सर्व मान्यवरांना आश्वस्त केले. संस्थेचे सदस्य प्रविण जोग व प्रविण माणकेश्वर यांनी देखील विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी खेलो इंडिया अंतर्गत राज्य स्तरावर प्रथम व राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचा व तालुक्याचा नावलौकिक वाढवल्या बद्दल गायत्री वाकोडीकर या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून 45, माध्यमिक गटातून 14, प्राथमिक शिक्षक गटातून 4, माध्यमिक शिक्षक गटातून 3 ,तर प्रयोगशाळा सहाय्यक गटातून 2 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. सूत्रसंचालन सिद्धार्थ एडके, तर योगेश ढवारे यांनी आभार मानले.
निकाल असा :
प्राथमिक गट : प्रथम-वरद सारडा (प्रिंस इंग्लीश स्कूल), द्वितीय-लाये समृद्धी (नूतन कन्या प्रशाला)
.तृतीय-बेरगुडे सायली (माॅडर्न इंग्लीश स्कूल ),माध्यमिक गट : प्रथम-इबितवार वैष्णवी (शांताबाई नखाते वि.वालूर), द्वितीय-अब्दुल बारी (प्रिंस इंग्लीश स्कूल सेलू), तृतीय-प्रताप पौळ (ज्ञानतीर्थ वि.सेलू),
प्राथमिक शिक्षक गट : प्रथम – कीर्ती राऊत (नूतन कन्या प्रशाला), माध्यमिक शिक्षक गट : सौ.गांजापुरकर( नूतन विदयालय), प्रयोगशाळा सहाय्यक : हजारे एम डी. (नूतन विदयालय सेलू)
हेही वाचा :
कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर
सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण
…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम
क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात
विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम
कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम