नितीन चषक : क्रिकेट स्पर्धचे आज सेलूत उद्घाटन; मंत्री संदीपान भुमरे यांची उपस्थिती

नितीन चषक : क्रिकेट स्पर्धचे आज सेलूत उद्घाटन; मंत्री संदीपान भुमरे यांची उपस्थिती

माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा पुढाकार, नऊ दिवस रंगणार क्रिकेटचे सामने

सेलू जि.परभणी : सेलू तालुका क्रिकेट संघटना  व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २१ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत राज्यस्तरीय निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री संदीपानराव भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी, २१ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे.  

नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना साकोरे असतील. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना आमदार संतोष बांगर, अभिमन्यु खोतकर, महादेवराव कदम, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर  सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, माजी उपनगराध्यक्ष प्रकाशराव जंगले, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, सईद खान उर्फ गब्बर, बाळासाहेबांची युवासेना जिल्हा प्रमुख दिपक टेंगसे, खाजा भाई पठाण आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भोजन, निवास करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख बक्षीस, मालिकावीरास स्कुटी देण्यात येणार आहे. यासाठी प्रायोजकत्व  संजय लोया, राजूशेठ लोया, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर मेड मार्ट, मानसी कलेक्शन, नटराज ग्रुप प्रमोद सांगतानी,  रामेश्वर गटकळ ,बंडू देवधर, प्रतिक काळे, लक्ष्मी मॉल, जाजू इंडट्रीज, मयूर वाघ, ॲड.अशोक अंभोरे पाटील, फ्रेंड्स क्लब ओमप्रकाश तोष्णीवाल,पारस काला, नामदेव (अप्पा) डख, प्रशांत गोळेगावकर, प्रकाश जंगले,  खाजा भाई पठाण यांनी स्वीकारले आहे. बाबा काटकर सर्व खेळाडूंना कोल्ड्रिंकची व्यवस्था करणार आहेत.

नितीन चषक ही गेल्या २३ वर्षांपासून चालणारी मराठवाड्यातील एकमेव क्रिकेट स्पर्धा, असून स्पर्धेत भारतीय क्रिकेट पटू  अतुल बेदाडे, संदिप पाटील, इकबाल सिद्दीकी अशा नामवंत खेळाडूंनी हजेरी लावली आहे. क्रिकेट प्रेमी खेळाडू नागरिकांनी क्रिकेट स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन नितीन क्रीडा मंडळ अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ लहाने व सचिव संदिप लहाने यांनी केले आहे. स्पर्धा संयोजक म्हणून गिरीश लोडाया, सहसंयोजक अविनाश शेरे, हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर, क्रीडांगण प्रमुख प्रा.नागेश कान्हेकर, डी.डी.सोन्नेकर, प्रा.के.के.कदम, राजेश राठोड, दिपक निवळकर, कुणाल लहाने हे काम पाहात आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!