नितीन चषक : बाळासाहेबांच्या स्मृती जागृत ठेवणारी स्पर्धा : आमदार संतोष बांगर

नितीन चषक : बाळासाहेबांच्या स्मृती जागृत ठेवणारी स्पर्धा : आमदार संतोष बांगर

पहिल्या दिवशी नांदेड संघाची विजयी सलामी

सेलू जि.परभणी : सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला येथील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शनिवारी, २१ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. 
उद्घाटन प्रसंगी आमदार संतोष बांगर म्हणाले, की २३ वर्षांपासून अविरतपणे ही स्पर्धा  चालू आहे. खेळाडूंनी जीवनात एक तरी खेळ खेळावा मी स्वतः कुस्तीच्या आखाडा तून राजकीय आखाड्यात आलो, आमदार हरिभाऊकाका लहाने माझे राजकीय गुरुवर्य आहेत‌. त्यांच्या पुढाकाराने चालणारी नितिन चषक  क्रिकेट स्पर्धा ही बाळासाहेबांच्या स्मृती जागृत ठेवणारी क्रिकेट स्पर्धा आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाने होते.  या वेळी अभिमन्यु खोतकर, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख महादेवराव कदम, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस डॉ. विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाशराव जंगले ,जिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना व्यंकटराव शिंदे , सईद खान उर्फ गब्बर , बाळासाहेबांची युवासेना जिल्हा प्रमुख दिपक टेंगसे, खाजा भाई पठाण विनायकअप्पा खंडागळे, पंडीतराव आरकुले, पांडुरंग कावळे, संभाजी पवार, विनायक रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक गिरीष लोडाया, सूत्रसंचालन मोहन बोराडे तर आभार सचिव संदीप लहाने यांनी मानले.

पहिला सामना विराट क्रिकेट संघ नांदेड वि. संजय वारीर्यस जालना दरम्यान झाला. यात
नांदेड संघाने 19.5 षटकात 165 धावा करत सर्व बाद झाले. संदिप पाटील 43,अमीरलाला 43, बालाजी धिरबाजी 22 धावा केल्या, तर जालना संघाच्या वतीने भेदक मारा सागर नामदे 3 गडी तर मनोज भगत व बबलू शिंदे 2 -2 गडी बाद केले.
165 धावांच्या प्रतिउत्तर देताना जालना संघाने 13 षटकात 97 धावांत सर्व गडी बाद झाले.यात अबेद शेख 24, पवन भोपळे 19 धाव करु शकले. नांदेड संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी सुनील यादव ने 3 गडी तर अमीर लाला, संदिप पाटील, शाहरुख काझी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. नांदेड संघाने 69 धावानी विजयी सलामी दिली.
सामन्याचे प्रायोजक नांदेड संघाचे दिलदार भाई, तर जालना संघाचे राजेश लोया यांनी केले.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना भोजन, निवास, व रोख बक्षीस, मालिकावीर स्कुटी देण्यात येणार आहे.
स्पर्धा संयोजक गिरीश लोडाया, सहसंयोजक अविनाश शेरे, हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर, क्रीडांगण प्रमुख प्रा. नागेश कान्हेकर, डी. डी. सोनेकर,प्रा.के.के. कदम, राजेश राठोड,दिपक निवळकर, कुणाल लहाने हे काम पाहत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!