चित्रकला प्रदर्शन : कलेमुळे सृजनशीलतेचा विकास : विनोद बोराडे

चित्रकला प्रदर्शन : कलेमुळे सृजनशीलतेचा विकास : विनोद बोराडे

नूतन कन्या प्रशालेतील चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन

सेलू जि.परभणी : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्याहस्ते झाले. या वेळी बोलतांना बोराडे म्हणाले, ” कलेमुळे व्यक्ती बहुश्रुत होतो, व्यक्तीची सुजनशीलता वाढते. व्यक्तीचा विकास होतो. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी  सुप्त कलागुणांचा विकास करायला हवा.”
या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. देशपांडे गुरूजी, संस्था सदस्य अजीझ खान पठाण, राजेश गुप्ता, प्रभाकर सुरवसे, गंगाधर कान्हेकर, रवी कुलकर्णी, परीक्षक म्हणून रवी मुळावेकर, किशोर कटारे, उज्ज्वला देशपांडे, गिरीश लोडाया, माता पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष माधुरी देशपांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत गीत पूजा महाजन यांनी सादर केले. कलाशिक्षक गजानन मजगे यांच्या मार्गदर्शनात  चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या वेळी गजानन मजगे, कैलास मलवडे ,बाबासाहेब थोरे, शेख शिफा, शेख इसरा, गाडेकर संस्कृती या विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात डी.के देशपांडे म्हणाले की, “विद्यार्थिनींनी आपल्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा. आपले कलागुण जोपासायले हवे” सूत्रसंचालन वैशाली चव्हाण यांनी, तर आभार कीर्ती राऊत यांनी मानले.* कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!