सामाजिक बांधिलकी : स्वतःच्या मुलीच्या लग्नात पाच सामूहिक विवाह; हाजी शफीकअली खान याचा पुढाकार
दाग दागिने व संसार उपयोगी वस्तू दिल्या, हाजी शफीकअली खान यांनी जपली सामाजिक बांधिलकी
सेलू जि.परभणी : येथील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक हाजी शफीक अली खान रफिक अलिखान यांनी आपली मुलगी बिबी महेनुर हीचा परभणी येथील महाराष्ट्र युवक काँग्रेस माजी सरचिटणीस इरफान उर रहेंमान खान याचा मुलगा फतिख अझान खान याच्या सोबत पाच गरीब मुलीचे विवाह करून देत सामाजिक बांधलिकीचे दर्शन घडविले.
सेलू येथील बाहेती मंगल कार्यलयात हा विवाह सोहळा झाला. या मध्ये तीन मुलीला पित्याचे छत्र नव्हते, तर दोन मुली आर्थिक दुर्बल व रोज मजुरी करणाऱ्या कुुटुंबातील आहेत. पाच मुलीला आपल्या स्वतः च्या मुलीच्या लग्न मंडप मध्ये लग्न लावून देण्यासाठी हाजी शफीक अली खान यांनी पुढाकार घेतला. या विवाहाचे धार्मिकरित्या खुतबा पठण मौलना तज्जुमल अहमद कास्मी यांनी केले. या पाच मुलींना संसार उपयोगी वस्तू ,तीन ग्रॅम सोने दागिने, श्रृंगार साहित्य , पलग, गादी, कपाट,पाच ड्रेस दिले गेले.
या विवाह समारोहमध्ये आमदार बाबाजानी दुराणी, साईबाबा नागरिक बँकेचे अध्यक्ष हेमंत आडळकर, युवा नेत्या प्रेक्षा भाबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,सेलू भूषण जयप्रकाश बिहाणी, ,उद्योजक वल्लभ सेठ लोया, राजेश गुप्ता प्रतष्ठित नागरिक, पत्रकार, डॉक्टर, वकील, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी माजी नगर सेवक उरुज लाला ,हाजी आलिषेर खान,इम्रान खान,
मेहराज खान,सोहेल खान, शहेजाद खान व मित्र परिवाराने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मौलाना सादिक
नदवी यांनी केले.