रुग्णांचे हाल : सेलू उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर सुरू करा; रूग्णसेवा संघर्ष समितीची मागणी
रुग्णालय प्रशासनाला निवेदन, औषधींचाही तुटवडा
सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन थिएटर गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. रुग्णांची कुचंबना टाळण्यासाठी ऑपरेशन थिएटर तात्काळ सुरू करावे, अशी मागणी रूग्णसेवा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना शुक्रवारी, तीन फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन थिएटरचे काम सुरू होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. ऑपरेशन, डिलेव्हरी, सिझरींग यासाठी रुग्णांना इतरत्र रेफर करण्यात येत आहे. सध्या ऑपरेशन थिएटरचे काम पूर्ण झाले आहे. तरीही ऑपरेशन थेटर बंद ठेवून रुग्णांची कुचंबना केली जात आहे. तसेच रुग्णालयात रुग्णांसाठी औषधींचा तुटवडा होत आहे. तो पूर्ववत करावा. ऑपरेशन थेटर तात्काळ सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक शेख रहीम, शेख रफिक, लालू खान, गुलाब पौळ, अमित बरलोटा, शेख दिलवार, शेख इस्माईल आदींच्या सह्या आहेत.
रूग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. ऑपरेशन, डिलेव्हरी, सिझरींग यासाठी रुग्णांना इतरत्र रेफर करण्यात येत आहे. सध्या ऑपरेशन थिएटरचे काम पूर्ण झाले आहे. तरीही ऑपरेशन थेटर बंद ठेवून रुग्णांची कुचंबना केली जात आहे. तसेच रुग्णालयात रुग्णांसाठी औषधींचा तुटवडा होत आहे. तो पूर्ववत करावा. ऑपरेशन थेटर तात्काळ सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा : पंतप्रधान : किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता गावातील पोस्टातून
हेही वाचा : अर्थसंकल्प : आर्थिक स्थिरता, संपन्नता देणारा : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर