सन्मान सोहळा : सेलूच्या माती आणि माणसांमध्ये स्नेहसंबंधांची संस्कृती : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन

सन्मान सोहळा : सेलूच्या माती आणि माणसांमध्ये स्नेहसंबंधांची संस्कृती : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन

विनोद बोराडे मित्रमंडळाचे आयोजन, अधिकारी व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात

सन्मान सोहळा : जनतेच्या प्रेम, सहकार्यातूनच विकासाला मिळते नवी दिशा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे 

परभणी : एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. विविध प्रसंगांना समोरे जावे लागते. यामध्ये राजकीय नेतृत्वासोबतच जनतेचे प्रेम, स्नेह आणि सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावत असते. यातूनच त्या त्या परिसराच्या प्रगतीसाठीही पोषक वातावरण निर्माण होऊन, विकासाला नवी दिशा मिळत असते, अशीच स्नेहसंबंधांची संस्कृती सेलूच्या माती आणि माणसांमध्ये रुजलेली आहे, असे प्रतिपादन परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी येथे केले. 

सेलू (जि.परभणी) येथील विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी (४ फेब्रुवारी) अधिकारी व सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ.प्रताप काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे होते. या वेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, सत्कारमूर्ती डॉ.प्रताप काळे, मुख्याधिकारी देविदास जाधव, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महात्मा गांधी सेवा संघाचे अध्यक्ष शशीकांत देशपांडे,  सचिव विजय कान्हेकर; तसेच तहसीलदार दिनेश झांपले, जिंतूरचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्राचार्य.डॉ.शरद कुलकर्णी, प्रशांत थारकर, अनिकेत पालेपवाड, ज्योत्सना काळे, विमल देशपांडे, भाग्यश्री कान्हेकर, भाग्यश्री जाधव, विजया बोराडे, उर्मिला बोराडे, साईराज बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती

.सन्मान सोहळा : जनतेच्या प्रेम, सहकार्यातूनच विकासाला मिळते नवी दिशा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे 

आठवणींना उजाळा देत डॉ.प्रताप काळे म्हणाले, की सेलूशी माझे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. येथील सव्वा चार वर्ष उपविभागीय अधिकारी म्हणून बजावलेली सेवा कायम संस्मरणीय ठरणारी आहे. या मातीतील माणसांमध्ये स्नेहसंबंधाची  संस्कृती रुजलेली आहे. ती काही औरच आहे. इथे जो माणूस राहतो, तो सेलूकरांशी कायम नाळ जोडून राहतो. या शहराच्या विकासामध्ये सर्वच राजकीय नेतृत्वांनी, जनतेने सहभाग नोंदवला आहे. शैक्षणिक, क्रीडा, उद्योग, व्यापार, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात काम करणारी माणसे, संस्था सेलूत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा इथली माणसं रममाण झालेली दिसतात. म्हणूनच सर्वसामान्यांचे लहानसहान प्रश्न देखील मी सोडवू शकलो. येथील राजकीय नेतृत्वाने नेहमीच प्रशासनाला सकारात्मक सहकार्याची भूमिका ठेवली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने गुणवत्तेचा दर्जा कायम राखलेला आहे. डॉ.संजय रोडगे यांच्या श्रीराम प्रतिष्ठानने सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवून लौकिक प्राप्त केलेला आहे. भविष्यातही सेलूच्या विकासाकरिता प्रशासकीयस्तरावरून मला जी काही मदत करणे शक्य आहे. ती निश्चितपणे करण्याचा ग्वाही काळे यांनी या वेळी दिली. विजय कान्हेकर यांनी सेलू परिसरात सहिष्णू वातावरण असल्याचे नमूद करून, महात्मा गांधी सेवा संघाच्यावतीने दिव्यांगांचे जगण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सन्मान सोहळा : जनतेच्या प्रेम, सहकार्यातूनच विकासाला मिळते नवी दिशा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे 

या वेळी डॉ.प्रताप काळे, देविदास जाधव, शशीकांत देशपांडे, विजय कान्हेकर यांचा शाल, पुषपहार व श्री साईबाबांची प्रतिमा देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. परळी येथील पर्यावरणप्रेमी चेतन सौदळे, डॉ.ऋतुराज साडेगावकर यांचादेखील या वेळी सत्कार करण्यात आला. महसूल प्रशासन, व्यापारी व इंडस्ट्रीयल ओनर्स असोसिएशन, किराणा असोसिएशन, जेष्ठ नागरिक संघ, सेलू नागरी सहकारी पतसंस्था, संत गोविंदबाबा शिक्षण प्रसारक मंडळ,  सेलू तालुका मराठी पत्रकार संघ,  दिव्यांग संघ, श्री केशवराज शिक्षण प्रसारक मंडळ, टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन, साईराज बोराडे मित्रमंडळ आदींसह विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विनोद बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. गिरीश लोडाया यांनी आभार मानले. या निमित्ताने महागायक मोहंमद आय़ाज वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला. डॉ.प्रताप काळे यांनाही गाण्याचा मोह आवरता आला नाही. सेलूतील महसूल कर्मचारी अर्चना गायकवाड व बालकलाकार श्रीजा दांपले यांनी सादर केलेल्या कलेला श्रोत्यांचे उत्स्फूर्त दाद मिळाली.

सन्मान सोहळा : जनतेच्या प्रेम, सहकार्यातूनच विकासाला मिळते नवी दिशा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे 

कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष मारोजी चव्हाण, प्रभाकर सुरवसे, राजेंद्र पवार, अशोक कासार, साईराज बोराडे, रामप्रसाद गोरे आदींसह विनोद बोराडे मित्रमंडळाने पुढाकार घेतला. उद्योजक  जयप्रकाश बिहाणी, श्रीराम प्रतिष्ठानचे अधयक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ.सविता रोडगे, राजेश गुप्ता, सुरेंद्र तोष्णीवाल, रामेश्वर राठी, प्रभुदयाल मंत्री, रामप्रसाद साबू, नंदलाल परताणी, मदनभाऊ करवा, श्रीवल्लभ लोया, बाळूशेठ गिल्डा, चंद्रशेखर नावाडे, चंद्रप्रकाश सांगतानी, श्रीनिवास झंवर, मंडळ अधिकारी मुकुंद आष्टीकर, डी.व्ही.मुळे, लक्ष्मण बागल, नारायण पाटील, दिलीप डासाळकर, कांचन कोरडे, मोहमंद इलियास, शेख मोहसीन, अबरार बेग, किशोर कटारे, प्रा.राजाराम झोडगे, सुरेश खापरे, वसंत डासाळकर, डॉ.सुनील कुलकर्णी, सर्जेराव लहाने, प्रशांत माणकेश्वर, उरुजअली खान, अशोक फोफसे, लक्ष्मण बुरेवार, नबाजी खेडेकर, गणेश माळवे, व्यंकट चव्हाण, शंकर राऊत, बालासाहेब सरकाळे, गंगाधर कान्हेकर, रवी मुळावेकर, डॉ.गंगाधर गळगे आदींसह प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विनोद बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. गिरीश लोडाया यांनी आभार मानले. या निमित्ताने महागायक मोहंमद आय़ाज वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला. या मध्ये डॉ.प्रताप काळे यांनाही गाण्याचा मोह आवरता आला नाही. सेलूतील महसूल कर्मचारी अर्चना गायकवाड व बालकलाकार श्रीजा दांपले यांनी सादर केलेल्या कलेला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

(छायाचित्रे : शंभू काकडे, सेलू)

हेही वाचा : राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा : सेलूची नूतन कन्या सर्वप्रथम, खुदनापुरची ‘विद्याभारती’ द्वितीय

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!