राज्यस्तरीय समूहनृत्य : सेलूत रविवारी स्पर्धा, श्रीराम प्रतिष्ठानचे आयोजन
कोळी नृत्य, गरबा, आदिवासी नृत्य, भांगडा, गोंधळ आदी प्रकार सादर होणार, संघ पाठविण्याचे शाळांना आवाहन
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल सेलू येथे रविवारी, पाच फेब्रुवारी रोजी विद्याविहार संकूल येथे आयोजित करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, त्यांच्या कलेला चालना मिळावी या उद्देशाने या राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय स्तरावरील असल्याकारणाने इयत्ता ५ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थी या स्पर्धेत शाळेच्यावतीने सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा विषय मध्ये कोळीनृत्य, गरबा, आदिवासी नृत्य, भांगडा, गोंधळ, धनगर नृत्य, वाघ्यामुरळी, भारुड, शेतकरी नृत्य आदी भारतातील
लोकनृत्य वर आधारीत समूह नृत्य असावे. या स्पर्धेकरिता परभणी, हिगोली, नांदेड, जालना येथील संघ सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील व राज्यातील जास्तीत जास्त शाळांनी आपला संघ स्पर्धेकरिता पाठवावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी केले आहे.