क्रीडा व युवक सेवा संचालनालय : जपानमधील कुस्तीगीर संघटनेशी सामंजस्य करार, मंत्री गिरीश महाजन, आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती
पुण्यातील असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान संस्थेच्या समन्वयाने करार
परभणी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जपानमधील वाकायामा राज्याची कुस्तीगीर संघटना यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. गुरूवारी, दोन फेब्रुवारी रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या सोहळ्याला क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, वाकायामा राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष वातारू किमुरा, वाकायमाचे आमदार श्री तानेगुची, एएफजे संस्थेच्या सल्लागार आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, आयुक्त डॉ. सुहास दिवसे, राज्याचे माजी मुख्य सचिव मलिक जी तसेच मान्यवर उपस्थित होते. या करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सराव, तंत्रांची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे. पुणे स्थित असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान ( एएफजे) या संस्थेच्या समन्वयाने हा करार साध्य झाला आहे. एएफजे ही संस्था गेली 32 वर्ष भारत व जपान या दोन देशांचे विविध क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी झटत आहे.
या करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सराव, तंत्रांची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : जल्लोष : शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या विजयाचा महाविकास आघाडीतर्फे आनंदोत्सव