आकाश दर्शन : तीनशेवर विद्यार्थ्यांनी लुटला अनुभवाचा आनंद; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचे विशेष शिबिर
सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळाच रमले विद्यार्थी, टेलिस्कोपमधून अनुभवले आकाश दर्शन
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विद्याविहार संकूल परिसरात आयोजित दोन दिवशीय विशेष शिबिरात विविध कार्यक्रमांसह रात्रीच्या वेळी तीनशेवर विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाचा मनसोक्त आनंद लुटला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, विद्यार्थ्यांना आकाश दर्शन घडविणारे प्रा.निरंजन वेलनकर प्रॉस्पेरस पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रा.प्रगती क्षीरसागर, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवशीय कॅम्पमध्ये स्पोर्ट्स, घोडेस्वारी, बैलगाडी स्वारी, चूलीवरील स्वयंपाक, शेकोटीचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आकाश दर्शन तसेच लोणार येथील प्रसिद्ध असलेल्या सरोवराला भेट आदी उपक्रम या मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. सदरील कॅम्प मध्ये ज्ञानतीर्थ विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, प्रास्पेरस पब्लिक स्कूलचे एकुण ३१० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या कॅम्पचे मुख्य आकर्षण आकाश दर्शन कार्यक्रम होते. प्रा.निरंजन वेलनकर यांनी मुलांना टेलिस्कोपमधून कृत्तिका तारकागुच्छ, गुरूचे उपग्रह व चंद्राचे खड्डे व पहाटे सप्तर्षीतला वसिष्ठ जोडतारा असे ऑब्जेक्टस दाखविले. ग्रूपच्या मूडनुसार व परिस्थितीनुसार त्यांना काही माहिती देता आली, तारे पॉइंट करून दाखवता आले. रात्रीच्या चार सत्रात 250 पेक्षा अधिक मुलं मोठे होते, तर पहाटेच्या एका सत्रात 50 पेक्षा अधिक मुले सहभागी झाली होती.
कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांकरिता कब्बडी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आदी खेळ घेण्यात आले. घोडेस्वारी, बैलगाडीतून फेरफटका मारण्याचा मनमुराद आनंद घेतला. चुलीवरचा स्वयंपाक या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वत: स्वयंपाक करत चवीष्ट व खमंग खिचडी, पास्ता, पालक कबाब आदी पदार्थ बनविले. शेकोटीच्या कार्यक्रमादरम्यान शेकोटी पेटवत त्याभोवती गोलाकार उभे राहुन शेकोटी गीत गात नृत्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वैयक्तिक व सामुहिक नृत्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. सकाळी विद्यार्थ्यांचा योगा, कवायत केल्यानंतर लोणार येथे सहल गेली यामध्ये विद्यार्थ्यांनी ट्रॅकिंगसह निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेतला. कॅम्प यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रा.निरंजन वेलनकर यांनी मुलांना टेलिस्कोपमधून कृत्तिका तारकागुच्छ, गुरूचे उपग्रह व चंद्राचे खड्डे व पहाटे सप्तर्षीतला वसिष्ठ जोडतारा असे ऑब्जेक्टस दाखविले. ग्रूपच्या मूडनुसार व परिस्थितीनुसार त्यांना काही माहिती देता आली, तारे पॉइंट करून दाखवता आले. रात्रीच्या चार सत्रात 250 पेक्षा अधिक मुलं मोठे होते, तर पहाटेच्या एका सत्रात 50 पेक्षा अधिक मुले सहभागी झाली होती.