राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा : सेलूची नूतन कन्या सर्वप्रथम, खुदनापुरची ‘विद्याभारती’ द्वितीय

राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा : सेलूची नूतन कन्या सर्वप्रथम, खुदनापुरची ‘विद्याभारती’ द्वितीय

श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम : वसमतचे युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल तृतीय, प्रतिभा निकेतन, नूतन विद्यालय, माऊली इंग्लिश स्कूल, माणकेश्वर विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक

राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा :

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी, पाच फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. द्वितीय क्रमांक खूदनापूर येथील विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूलने मिळविला.

विद्याविहार संकुलातील एल.के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल या राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे पारवे, परीक्षक प्रा.अजय शेंडगे, प्रा.भुमिका चांदकर, चव्हाण बायोलाॅजी क्लासेसचे संचालक प्रा. प्रवीण चव्हाण, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, डॉ.राम रोडगे डीएड कॉलेजच्या प्राचार्य मीनाक्षी रत्नपारखी, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रगती क्षीरसागर ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सादरीकरण करत असतांना आपल्या चेहऱ्यावरील भाव भाव, सादरीकरणातील एकसारखेपणा हा नृत्य करतांना विशेष मानला जातो. याच अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, त्यांच्या कलेला चालना मिळावी, या उद्देशाने या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केल्याचे आयोजक डॉ.संजय रोडगे यांनी सांगितले.
राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सेलूच्या नूतन कन्या प्रशाला यांनी मिळविला. रोख रक्कम अकरा हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक खूदनापूर येथील विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूलने मिळविला. रोख रक्कम सात हजार रुपये व स्मृतिचिन्ह होते. तृतीय क्रमांक वसमत येथील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल यांनी मिळविला. बक्षीसाचे स्वरूप रक्कम रोख पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह होते. उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे प्रतिभा निकेतन हायस्कूल नांदेड, नूतन विद्यालय सेलू यांना प्रत्येकी २००० रूपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माऊली इंग्लिश स्कूल, मंठा व मानकेश्वर विद्यालय कौठा यांना प्रत्येकी २००० रू रोख रक्कम देऊन विशेष बक्षीस म्हणून गौरविण्यात आले. प्रास्ताविक मीनाक्षी रत्नपारखी यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा सापनर, दगडोबा माने, गणेश येवले, इंद्रजीत मोरे, सुरेश हारके, उद्धव येवले, दामोधर रासवे, कैलास ताठे, मुसळे, ठाकुर, वटाणे आदींनी परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा : सेलूची नूतन कन्या सर्वप्रथम, खुदनापुरची ‘विद्याभारती’ द्वितीय

प्रथम क्रमांक विजेत्या सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या संघात मानवी सातपुते, आरती पतंगे, स्नेहल थोरात, जानकी शर्मा, दुर्गेश्वरी शहाणे, साक्षी मगर, अनुराधा उगले, प्रगती खंदारे, मेघना हिंगे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. या संघाला सीमा सुक्ते, श्रीमती दामा, श्रीमती चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांचे मार्गदर्शन मिळाले. विजयी संघाचे संस्थेचे अधय़क्ष डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे गुरूजी, चिटणीस व्ही.के.कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापिका संगीता खराबे, दत्तराव घोगरे, रोहिदास मोगल , शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा : सन्मान सोहळा : सेलूच्या माती आणि माणसांमध्ये स्नेहसंबंधांची संस्कृती : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!