गुणवंतांचा गौरव : सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
सेवानिवृत्तांचा गौरव, विद्यार्थ्यांचे कौतुक
सेलू (जि.परभणी) : येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन सोमवारी (१३ फेब्रुवारी) उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अशोक काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले,राजेंद्र लहाने, प्राचार्य शरद कुलकर्णी, यशवंत चारठाणकर, डॉ.मारोती कसाब, डॉ.अनिकेत जोगदंड, संतोष कुलकर्णी, ब्रिजगोपाल काबरा, प्रा. विठ्ठल डख, ॲड.अशोक फोपसे, ॲड गोविंद शेळके प्राचार्य एम.एम. कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सेवा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्याना पारितोषिक वितरित करण्यात आली. यानिमित्ताने समूह नृत्य व ‘डॉ.गडबडे’ ही विनोदी नाटिका सादर करण्यात आली. प्रास्ताविक पर्यवेक्षक धनंजय भागवत यांनी केले. सूत्रसंचालन डी.सी.सोळंके, प्रनयना तेलगोटे, संतोष कुलकर्णी यांनी केले. रामेश्वर गाडेकर, एस.टी.नागरे, मंगल जोगदंड, कुरेशी, तोंदुलवार, रोटेवाड सर, शिंदे, पवार आदींनी परिश्रम घेतले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना तहसीलदार दिनेश झांपले म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी खेळ,कला आवश्यक आहे. यासाठी स्नेहसंमेलनांची आवश्यकता आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, लावणी, कोळी, हिंदी गीतांवर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘डॉ.गडबडे’ या नाटिकेने खळखळून हसविले.
Politics : फडणवीसांनी खरं बोलायला शिकावं : खासदार सुप्रिया सुळे